पर्सनल मोमेंट क्लीक करणाºया फोटोग्राफरवर राधिका आपटे भडकली; म्हटले ‘लगेचच डिलीट कर माझे फोटो’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 19:35 IST2017-07-25T14:05:43+5:302017-07-25T19:35:43+5:30

‘पार्च्ड’ या चित्रपटात इंटीमेट सीन्स दिल्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या मीडिया फोटोग्राफरवर चांगलीच संतापलेली असल्याचे दिसून येत ...

Radika Apte blasted on photographers making personal moments; I immediately deleted my photo! | पर्सनल मोमेंट क्लीक करणाºया फोटोग्राफरवर राधिका आपटे भडकली; म्हटले ‘लगेचच डिलीट कर माझे फोटो’!

पर्सनल मोमेंट क्लीक करणाºया फोटोग्राफरवर राधिका आपटे भडकली; म्हटले ‘लगेचच डिलीट कर माझे फोटो’!

ार्च्ड’ या चित्रपटात इंटीमेट सीन्स दिल्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटे सध्या मीडिया फोटोग्राफरवर चांगलीच संतापलेली असल्याचे दिसून येत आहे. एका प्रसिद्ध वेबसाइटच्या वृत्तानुसार, ‘मुंबईतील एका मॉलमध्ये ‘बाजार’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. काही सीन शूट केल्यानंतर राधिका तिच्या वॅनिटी व्हॅनमध्ये लंचसाठी गेली. लंचनंतर ती व्हॅनबाहेर काही वेळ फिरत होती. अशात एका फोटोग्राफरने तिचे काही पर्सनल मोमेंट क्लिक केले. जेव्हा ही बाब राधिकाच्या लक्षात आली तेव्हा तिच्या रागाला पारावार उरला नाही. ती अशी काही भडकली की, थोड्या वेळासाठी भोवतालचे लोक घाबरून गेले. राधिकाने त्या फोटोग्राफरला खडे बोल सुनावत म्हटले की, माझ्या परवानगीशिवाय तू माझे फोटो काढलेच कसे? सर्व फोटो लगेचच डिलीट कर. 

फोटोग्राफरवर भडकण्याचे राधिकाचे आणखी एक कारण म्हणजे तिला तिचा लूक लिक करायचा नव्हता. कदाचित निर्मात्यांनीच तिला याबाबतचे आदेश दिले असावेत. त्यामुळेच तिने फोटोग्राफरवर राग व्यक्त केला. निखील आडवाणी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या एका चित्रपटात राधिका काम करीत असून, हा चित्रपट याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. चित्रपटात राधिकाबरोबर सैफ अली खान आणि चित्रांगदा सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 



‘पॅडमॅन’ची अभिनेत्री असलेल्या राधिकाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते की, मुलींनी नेहमीच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, पिरियड्समुळे त्या काहीच करू शकत नाही. जसे की, पिरियड्स चालू आहेत, म्हणून होळी कशी खेळणार? अशा शंका कधीही मनात येऊ नयेत. त्यामुळे अशा दिवसांमध्ये जर कम्फर्टेबल राहायचे असेल तर तुम्हाला तुमची मेंटॅलिटी बदलावी लागेल. राधिकाच्या मते ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, याची भीती मनात ठेवणे चुकीचे आहे. राधिकाच्या या वक्तव्यानंतर तिचे काही स्तरातून कौतुकही केले होते. 

त्याचबरोबर राधिका सध्या तिने दिलेल्या न्यूड सीन्समुळेही चर्चेत आहे. यावर पडदा टाकण्यासाठी राधिकाने म्हटले होते की, जर स्टोरी डिमांड असेल तर न्यूडिटी स्वाभाविक आहे. जर तुमचे विचार चांगले असतील अन् कथेची डिमांड असेल तर तुम्ही नेक्ड होऊन डान्स करावा तर मला यामध्ये काहीच वावगे वाटत नाही. पुढे बोलताना राधिकाने म्हटले होते की, मी एक आर्टिस्ट असून माझ्या शरीराचा कसा वापर करायचा ते मला चांगले ज्ञात आहे. राधिकाने ‘पार्च्ड’ या चित्रपटामध्ये अतिशय बोल्ड सीन्स देऊन बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. 

Web Title: Radika Apte blasted on photographers making personal moments; I immediately deleted my photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.