राधिकाच्या सेक्स सीन असलेल्या ‘पार्च्ड’ ची खुलेआम विक्री !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 12:11 IST2016-09-07T06:41:56+5:302016-09-07T12:11:56+5:30
अजय देवगणचे प्रॉडक्शन असलेल्या राधिका आपटेचा चित्रपट ‘पार्च्ड’ २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाच्या अगोदरच रस्त्यावर खुलेआम विकला ...

राधिकाच्या सेक्स सीन असलेल्या ‘पार्च्ड’ ची खुलेआम विक्री !!!
त्यानंतर आता संपूर्ण चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पंधरादिवस आधी थेट रस्त्यावर विक्री होत असताना दिसत आहे. विशेष म्हणजे याचा अजूनही पत्ता खुद्द निर्माता असलेल्या अजय देवगणलाही नसल्याचे समजते.
गुजरात मधील दुष्काळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट लीना यादव यांनी दिग्दर्शित केला आहे. यात रानी, लाजो, बिजली आणि जानकी या चार महिलांची कथा दाखवण्यात आली आहे.
‘पार्च्ड’' चित्रपटाला जगभरातील फिल्म फेस्टीव्हलमध्ये २४ पुरस्कार मिळाले आहेत. हा चित्रपट २३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल आणि याचा ट्रेलर ९ सप्टेंबरला प्रदर्शित होईल, असे अजय देवगणने काही दिवसापूर्वीच ट्विटरवरुन कळवले होते.
‘पार्च्ड’मध्ये राधिका आपटेसोबत आदिल हुसेन, सुर्वीन चावला, तनिष्ठा चटर्जी आणि सयानी गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.