​हर्षवर्धनसोबत झळकणार राधिका??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 20:40 IST2016-06-07T15:10:41+5:302016-06-07T20:40:41+5:30

राधिका आपटे म्हणजे ‘नॉट सो कमर्शिअल’ सिनेमातील  ‘हॉट प्रॉपर्टी’आहे. पण यापुढे कदाचित असे म्हणता येणार नाही. ‘फोबिया’अ‍ॅक्टर राधिका एका ...

Radhika will see Harshvardhan? | ​हर्षवर्धनसोबत झळकणार राधिका??

​हर्षवर्धनसोबत झळकणार राधिका??

धिका आपटे म्हणजे ‘नॉट सो कमर्शिअल’ सिनेमातील  ‘हॉट प्रॉपर्टी’आहे. पण यापुढे कदाचित असे म्हणता येणार नाही. ‘फोबिया’अ‍ॅक्टर राधिका एका कमर्शिअल सिनेमात हजेरी लावणार असल्याची बातमी आहे. होय, विक्रम मोटवानी यांच्या ‘भावेश जोशी’ या आगामी चित्रपटात हर्षवर्धन कपूर याच्यासोबत राधिका झळकणार असल्याचे समजते. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन लवकरच ‘मिर्झा’मधून बॉलिवूड डेब्यू करतो आहे. हर्षवर्धनच्या अपोझिट राधिकाला घेण्यास मेकर्स उत्सूक आहेत. यासंदर्भात राधिकाशी बोलणी सुरु असल्याचेही कळते. आता ही संधी राधिका निश्चितपणे गमावणार नाही, असे सध्या तरी वाटतेय..पुढे काय, ते लवकरच कळेल..

Web Title: Radhika will see Harshvardhan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.