राधिका मदनचा 'हा' चित्रपट दाखवला जाणार 'टीआयएफएफ'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 02:15 PM2018-09-11T14:15:04+5:302018-09-12T06:00:00+5:30

राधिका मदनचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) दाखविण्यात येणार आहे. यासाठी राधिका खूपच उत्साहित आहे.

Radhika Madan's 'this' movie will be shown in 'TIFF' | राधिका मदनचा 'हा' चित्रपट दाखवला जाणार 'टीआयएफएफ'मध्ये

राधिका मदनचा 'हा' चित्रपट दाखवला जाणार 'टीआयएफएफ'मध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे'मर्द को दर्द नही होता' चित्रपटात राधिकाचा अनोखा अंदाजराधिका मदनने गिरवले मार्शल आर्ट्सचे धडे


छोट्या पडद्यावरील अभिनेत्री राधिका मदन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. राधिकाने एकता कपूरची मालिका 'मेरी आशिकी तुमसे ही'मधून अभिनय क्षेत्रातील करियरला सुरूवात केली होती. यात तिने ईशानी वाघेलाची भूमिका केली होती. तसेच तिने झलक दिखला जामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ती विशाल भारद्वाजच्या 'पटाखा' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यात ती चंपा कुमारी या गावातील तरूणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा 'मर्द को दर्द नही होता' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (टीआयएफएफ) दाखविण्यात येणार आहे. यासाठी राधिका खूपच उत्साहित आहे.

'मर्द को दर्द नही होता'ला टीआयएफएफ २०१८ मध्ये वर्ल्ड प्रिमीयरसाठी निवडण्यात आले आहे. यावर राधिका प्रतिक्रिया देत म्हणाली, 'एक नवोदित अभिनेत्री म्हणून टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळण्याचा अनुभव खूपच छान असणार आहे. पुढे म्हणाली, माझ्या करिअरचा हा काळ खूपच छान आहे. सलग माझे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे एका स्वप्नासारखेच आहे.'
 'मर्द को दर्द नही होता' या चित्रपटात अभिमन्यू दासानीची महत्वाची भूमिका आहे. या सिनेमात राधिका अॅक्शन करताना दिसणार आहे. तसेच तिने यासाठी मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग घेतले आहे. याबाबत राधिका सांगते की, 'मला अॅक्शन सिनेमे आवडत नाही. मी अॅक्शनपट पाहत नाही. मी सुपरमॅन, बॅटमॅन हे चित्रपट पाहिले नाहीत. मला रोमँटिक चित्रपट आवडतात. मला 'मर्द को दर्द नही होता' चित्रपटासाठी अॅक्शन सीन करायचे होते. मी कधीच साधी किक देखील मारली नव्हती. त्यामुळे मला अॅक्शन चित्रपट पाहावे लागले आणि आठ महिने मार्शल आर्टची ट्रेनिंग घ्यावी लागली. आता मला अॅक्शन आवडायला लागले आहे.'

Web Title: Radhika Madan's 'this' movie will be shown in 'TIFF'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.