राब्ताच्या टीमने जिंकली केस उद्या रिलीज होणार सिनेमागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 12:06 PM2017-06-08T12:06:32+5:302017-06-08T17:41:03+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि कृति सॅनन यांचा राब्ता चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. राब्ताची स्टोरी तेलगु सुपरहिट चित्रपट मगधीरावरुन ...

Rabta's team won the case tomorrow to be released in the cinema hall | राब्ताच्या टीमने जिंकली केस उद्या रिलीज होणार सिनेमागृहात

राब्ताच्या टीमने जिंकली केस उद्या रिलीज होणार सिनेमागृहात

googlenewsNext
शांत सिंग राजपूत आणि कृति सॅनन यांचा राब्ता चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. राब्ताची स्टोरी तेलगु सुपरहिट चित्रपट मगधीरावरुन कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यासंदर्भात मगधीरा चित्रपटाचा निर्माता अल्लु अरविंद यांने हैदरबाद कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने निकाल राब्ता चित्रपटाच्या टीमच्या बाजूने दिला आहे. राब्ताची टीम ही केस जिंकली आहे. 

कोर्टात जवळपास 5 तास या गोष्टीवर चर्चा झाली आणि यातून हेच निष्पन्न झाले की राब्ता आणि मगधीरा दोन्ही चित्रपटांची स्टोरीलाईन आणि स्क्रिप्ट खूप वेगळ्या आहेत. या गोष्टीची माहिती खुद्द टी-सिरीजचे वकील अंकित रेलन यांनी कोर्टापुढे सादर केली. 

राब्तचे निर्माता अल्लु अरविंद यांनी आपली युनिक स्टोरी चोरल्याचा आरोप राब्ताच्या निर्मात्यावर आणि दिग्दर्शकावर केला होता. मात्र कोर्टाने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे आता कोणत्याही अडचणींशिवाय हा चित्रपट उद्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राब्ता चित्रपटाचा दिग्दर्शक दिनेश विजन यांने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. सुशांत आणि क्रिती सॅननची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चांगली रंगल्याचे दिसून येतेयं.  हा चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांनी पाहिला आणि त्यांनी चित्रपटातील सुशांत आणि क्रितीच्या किसिंग सीन्सवर हरकत नोंदवली. राब्ताला जर यू/ ए सर्टिफिकेट हवे असेल तर चित्रपटातून अपशब्द काढावे लागतील अन्यथा राब्ताला फक्त ए सर्टिफिकेट देण्यात येईल असे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाविषयीची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण कॅमिओ करणार आहे

Web Title: Rabta's team won the case tomorrow to be released in the cinema hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.