आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर ऋषी कपूर भावूक ; सगळ्या आठवणी नष्ट झाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीयं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:56 AM2017-09-18T04:56:38+5:302017-09-18T10:26:38+5:30

आर. के. स्टुडिओ  चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. शनिवारी लागलेल्या या ...

R. K. Rishi Kapoor emotionally after studio fire; All memories disappeared, I still can not believe! | आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर ऋषी कपूर भावूक ; सगळ्या आठवणी नष्ट झाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीयं!

आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर ऋषी कपूर भावूक ; सगळ्या आठवणी नष्ट झाल्या, मला अजूनही विश्वास बसत नाहीयं!

googlenewsNext
. के. स्टुडिओ  चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला लागलेली भीषण आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. शनिवारी लागलेल्या या आगीत कुठलीही जीविताहानी झालेली नाही. पण आर. के. स्टुडिओतील अनमोल ठेवा या आगीत नष्ट झाला आहे. 

स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर  ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली. या आगीने अनेक जुन्या आठवणी नष्ट झाल्या. दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

१९५१ मध्ये मधला  ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’,१९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’,‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण आगीत हे सगळे कॉस्च्युम भस्म झाले आहेत.  ऋषी कपूर  यांच्यामते, ही कधीही भरून न निघणारी क्षति आहे. ‘स्टुडिओ पुन्हा उभा केला जाऊ शकतो. पण आर. के. चित्रपटांच्या आठवणी पुसरल्या गेल्यात. या चित्रपटांचे कॉस्च्युम जळून खाक झालेत. ही हानी कधीही भरून न निघणारी असल्याने दु:खद आहे,’ असे tweet ऋषी कपूर यांनी केले आहे. आर. के. स्टुडिओ अग्निकांडानंतर मुंबई मिररशी बोलताना  ऋषी कपूर काहीसे भावूक झाले.  आर. के.स्टुडिओला आग हा माझ्यासाठी धक्का आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे संरक्षित ठेवले जात. नरगिसपासून तर ऐश्वर्या राय बच्चनने त्यांच्या चित्रपटांत घातलेले पोशाख येथे संग्रहीत करण्यात आले होते. पण ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात पद्मिनीने घातलेले ज्वेलरी याठिकाणी संग्रहीत करण्यात आली होती. सगळ्याच आठवणी नष्ट झाल्यात, असे ते म्हणाले.

ALSO READ : जाणून घ्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या आर. के. स्टुडिओचा इतिहास!

 राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रे रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळतात.


Web Title: R. K. Rishi Kapoor emotionally after studio fire; All memories disappeared, I still can not believe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.