Quotation Gang Trailer: अंगावर काटाच! सनी लिओनी अन् जॅकी श्रॉफच्या नव्या सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:46 PM2023-01-17T13:46:12+5:302023-01-17T13:46:38+5:30

Quotation Gang Trailer: सगळ्यांचा लाडका भिडू अर्थात जॅकी श्राॅफ कधी नव्हे इतक्या खतरनाक लुकमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक विष्णू कन्ननच्या कोटेशन गँग या सिनेमात जॅकी एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत सनी लिओनीही आहे.

Quotation Gang Trailer: Jackie Shroff, Sunny Leone Are Brutal in This Crime Thriller | Quotation Gang Trailer: अंगावर काटाच! सनी लिओनी अन् जॅकी श्रॉफच्या नव्या सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा...

Quotation Gang Trailer: अंगावर काटाच! सनी लिओनी अन् जॅकी श्रॉफच्या नव्या सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर, पाहा...

googlenewsNext

Quotation Gang Trailer:  सगळ्यांचा लाडका भिडू अर्थात जॅकी श्राॅफ (Jackie Shroff) पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण यावेळी जॅकी कधी नव्हे इतक्या खतरनाक लुकमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक विष्णू कन्ननच्या कोटेशन गँग या सिनेमात जॅकी एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत सनी लिओनीही ( Sunny Leone) आहे. तर आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाये. हा ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

ट्रेलरमध्ये जॅकी व सनी लिओनी दोघंही जबरदस्त लुकमध्ये आहेत. ट्रेलरमध्ये प्रचंड हिंसा दिसते. इतकी की, अनेकजण पूर्ण व्हिडीओ बघू शकणार नाही. सगळ्यांच भूमिका खतरनाक आहेत.   चित्रपटाची कथा गँगवारवर बेतलेली आहे. मुंबई, चेन्नई, काश्मिरातील वेगवेगळ्या गँगची कथा यात सांगितली आहे. चित्रपटातील फीमेल कॅरेक्टरही हिंसक आहेत. रिपोर्टनुसार, कोटेशन गँग हा केरळातून चालवल्या जाणाऱ्या एका रिअल क्रिमिनल गँगवर आधारित आहे. या गँगचे लोक अगदी ५०० रूपयांसाठीही हत्या करायला तयार होतात.

सनी लिओनीचा कधीही न पाहिलेला लुक या ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. याआधी कुठल्याही चित्रपटात सनीला तुम्ही अशा अवतारात बघिलेलं नसेल. द फॅमिली मॅन या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियामणी ही सुद्धा चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय प्रदीप, विष्णू वारिअर, अक्षया, सोनल असे साऊथ इंडस्ट्रीचे चेहरेही यात आहेत.

कोटेशन गँग हा एक तामिळ सिनेमा आहे. मात्र तामिळसह हिंदी, तेलगू, मल्याळम व कन्नड भाषेतही तो रिलीज होतोय. 
 

Web Title: Quotation Gang Trailer: Jackie Shroff, Sunny Leone Are Brutal in This Crime Thriller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.