‘या’ अभिनेत्रीला डोनाल्ड ट्रम्प आणि केआरकेला विचारायचे ‘हे’ प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 20:03 IST2018-04-11T14:31:39+5:302018-04-11T20:03:44+5:30

अभिनेत्री आहना कुमाराने नुकतीच एक मुलाखत दिली असून, त्यामध्ये तिला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांना तिने मजेशीर उत्तरे दिली आहेत.

'This' question to ask the actress Donald Trump and KKK! | ‘या’ अभिनेत्रीला डोनाल्ड ट्रम्प आणि केआरकेला विचारायचे ‘हे’ प्रश्न!

‘या’ अभिनेत्रीला डोनाल्ड ट्रम्प आणि केआरकेला विचारायचे ‘हे’ प्रश्न!

िपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटात आपल्या अभिनयामुळे आहना कुमारा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र यावेळेस ती तिच्या चित्रपट किंवा फोटोशूटमुळे नव्हे तर एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. होय, या मुलाखतीत आहनाने असे काही म्हटले ज्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. आहनाने म्हटले की, मला कमाल राशिद खान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रायव्हेट पाटर््सवर बोलण्याची इच्छा आहे. आहनाच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, सध्या तो सर्वत्र व्हायरल होत आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टनुसार, रॅपिड फायर राउंडमध्ये आहना कुमाराला प्रश्न विचारण्यात आला की, ‘जर तुला एका आयलॅण्डवर डोनाल्ड ट्रम्प आणि कमाल राशिद खानसोबत राहण्याची संधी मिळाली तर तू काय करशील? याचे उत्तर देताना आहनाने म्हटले की, सर्वात अगोदर मी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारणार की, त्यांचे डोक्याचे केस आॅरेंज का आहेत? त्यानंतर मी कमाल राशिद खानला दोन रुपयांवरून प्रश्न विचारणार. आहनाने म्हटले की, कमाल राशिद खान ज्या लोकांना पसंत करीत नाही, त्यांना तो दोन रुपयांचा माणूस असे संबोधतो. त्याचबरोबर आहनाने म्हटले की, मी दोघांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर त्यांना प्रश्न विचारणार. 



वर्कफ्रंटविषयी सांगायचे झाल्यास आहना कुमारा लवकरच अभिनेते अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. चित्रपटाविषयी सांगताना आहनाने म्हटले की, ‘मला आयुष्याशी निगडित चित्रपट करायची इच्छा आहे. मी अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये कधी काम केले नाही. त्यामुळेच मी अशाप्रकारचे चित्रपट करण्यास उत्साहित आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटानंतर लोकांनी मला ओळखले हे माझ्यासाठी चांगली बाब आहे. दरम्यान, या चित्रपटात आहनासोबत रत्ना पाठक, कोंकणा सेन-शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

Web Title: 'This' question to ask the actress Donald Trump and KKK!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.