‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवींना सहन करावा लागला होता आई-आजीचा विरोध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:20 IST2017-10-25T04:50:19+5:302017-10-25T10:20:19+5:30
प्रख्यात शास्त्रीय गायिका तथा ‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने कोलकात्यात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ...
‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवींना सहन करावा लागला होता आई-आजीचा विरोध!
्रख्यात शास्त्रीय गायिका तथा ‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने कोलकात्यात उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. चाहत्यांमध्ये त्या अप्पाजी नावाने लोकप्रीय होत्या
जमीनदार कुटुंबात ८ मे १९२९ रोजी जन्मलेल्या गिरिजादेवी सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या. त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८९ मध्ये पद्मभूषण व २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले होते. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वयाच्या पाचव्या वषार्पासून त्यांनी त्या काळचे ज्येष्ठ गायक व सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे ख्याल व टप्पा गायनाचे धडे गिरवले.
![]()
गिरिजादेवींनी सन १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. अर्थात इथपर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. यासाठी त्यांना स्वत:च्या आई आणि आजीचा विरोध सहन करावा लागला होता.त्यांनी अशा प्रकारे जाहिर कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. त्याकाळी चांगल्या घरातील उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींच्या आई व आजीचेही हेच मत होते. अखेर या विरोधापुढे झुकत प्रारंभी कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे गिरिजादेवींनी मान्य केले. अर्थात सन १९५१ मध्ये बिहार प्रांतात त्यांनी आपला पहिला खुला संगीत कार्यक्रम सादर केला.
१९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९८० च्या दरम्यान त्यांनी कोलकात्याच्या आय. टी. सी. संगीत संशोधन संस्थेत तर १९९० दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे धडे दिलेत. याशिवाय संगीत साधनेचे कार्य अखंड सुरु ठेवत, २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवलेत.
गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.