आईवडिलांचे पाय धुवून पाणी प्यायला प्रसिद्ध गायक, म्हणाला- "इस्लाममध्ये हे चालत नाही, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:44 IST2025-11-10T12:42:46+5:302025-11-10T12:44:16+5:30
पंजाबी गायक खान साबने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आई-वडिलांचे पाय धुताना दिसत आहे. पाय धुवून झाल्यानंतर ते पाणी तो पित असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.

आईवडिलांचे पाय धुवून पाणी प्यायला प्रसिद्ध गायक, म्हणाला- "इस्लाममध्ये हे चालत नाही, पण..."
एका लोकप्रिय गायकाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ते पाहून चाहते लेक असावा तर असा, अशा भावना व्यक्त करत आहेत. पंजाबी गायक खान साबने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आई-वडिलांचे पाय धुताना दिसत आहे. पाय धुवून झाल्यानंतर ते पाणी तो पित असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे.
खान साब पोस्टमध्ये म्हणतो, "मला माहीत आहे की इस्लाममध्ये ही गोष्ट मान्य नाही. पण माझ्यासाठी माझे आई-वडील सगळं काही आहेत आणि राहतीलही. म्हणूनच मी माझ्या आई-वडिलांचे पाय धुवून ते पाणी प्यायलो, आणि मला याचं काहीही दुःख नाही की मी ही गोष्ट प्रत्यक्षात केली. माझ्या आईने मला नमाज वाचताना आवाज दिला, तेव्हा मी नमाज सोडून तिचं ऐकलं आणि आईला औषध दिलं. बाकी अल्लाह मला माफ करेल. कारण हुजुर यांनीही ही गोष्ट केली नव्हती". लेकाचं प्रेम पाहून आईवडिलांनाही अश्रू अनावर झाले आहेत.
आईवडिलांची सेवा न करणाऱ्यांनाही खान साबने पोस्टमधून मोलाचा सल्ला दिला आहे. "जे लोक आईवडिलांना धक्के मारून घराबाहेर काढतात अशा लोकांनी हा व्हिडीओ नक्की बघावा. ज्यांचे आईवडिल अजूनही त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. कारण त्यांच्या पायातील धूळसुद्धा तुमच्यासाठी अनमोल आहे", असं त्याने म्हटलं आहे. सिंगरच्या या व्हिडीओवर कमेंट करत लोक त्याचं कौतुक करत आहेत.