​ आॅस्करच्या शर्यतीत ‘पुलीमुरूगन’ची दावेदारी कायम! भारताच्या आशा पल्लवित!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:26 IST2017-12-20T07:50:15+5:302017-12-20T13:26:41+5:30

‘न्यूटन’ हा बॉलिवूड चित्रपट आॅस्करच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरी या शर्यतीतील भारताची दावेदारी अजून संपलेली नाही.  एका प्रादेशिक ...

'Pulimurugan' claims in Oscar race India's hope throws up !! | ​ आॅस्करच्या शर्यतीत ‘पुलीमुरूगन’ची दावेदारी कायम! भारताच्या आशा पल्लवित!!

​ आॅस्करच्या शर्यतीत ‘पुलीमुरूगन’ची दावेदारी कायम! भारताच्या आशा पल्लवित!!

्यूटन’ हा बॉलिवूड चित्रपट आॅस्करच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरी या शर्यतीतील भारताची दावेदारी अजून संपलेली नाही.  एका प्रादेशिक चित्रपटाने भारताच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत. होय, साऊथ सुपरस्टार मोहनलाल अभिनीत ‘पुलीमुरूगन’ या मल्याळम चित्रपटाने आॅस्करच्या शर्यतीत जागा बनवली आहे. ओरिजनल स्कोर (मूळ संगीत) आणि ओरिजनल सॉन्ग (मूळ गीत) विभागात ‘पुलीमुरूगन’ने दावेदारी मिळवली आहे. अ‍ॅकेडमी आॅफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसने १४१ स्कोर आणि ७० सॉन्गची यादी जाहिर केली आहे, जे यंदाच्या ९० व्या अ‍ॅकेडमी अवार्ड्सच्या या शर्यतीत सामील आहेत.
  विसाख दिग्दर्शित  ‘पुलीमुरूगन’ या चित्रपटातील ‘कादानयुम कालवीलम्बे’ आणि ‘मानते मारीकुरूम्बे’ ही गाणी ओरिजनल  सॉन्ग व ओरिजनल स्कोर  श्रेणीत समाविष्ट केली गेली आहेत. या दोन्ही श्रेणीत स्थान मिळवणारा ‘पुलीमुरूगन’ एकमेव भारतीय चित्रपट आहे. ‘कादानयुम कालवीलम्बे’ आणि ‘मानते मारीकुरूम्बे’ ही गाणी गोपी सुंदरने कम्पोज केली आहेत. सुंदरने सोशल मीडियावर परमेश्वराचे आभार मानले आहेत. ‘परमेश्वराची कृपा आहे....माझ्याकडे शब्दचं नाहीत...’असे त्याने लिहिले आहे. फायनल नॉमिनेशनची घोषणा येत्या २३ जानेवारीला होणार आहे आणि ४ मार्चला अ‍ॅकेडमी अवार्ड्स अर्थात आॅस्कर पुरस्काराची घोषणा होणार आहे.
‘पुलीमुरूगन’मध्ये मुरूगन नामक व्यक्तीची कथा दाखवली आहे. मुरूगन वाघांशी लढतो आणि त्यांना मारण्यात माहिर असतो, असे याचे कथानक आहे. सुपरस्टार मोहनलाल यांनी हा मुरुगन साकारला होता. सलमान खान या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात इंटरेस्टेड असल्याची बातमी मध्यंतरी आली होती.  

ALSO READ : निराश करणारी बातमी! राजकुमार रावचा ‘न्यूटन’ आॅस्कर शर्यतीतून बाहेर ! !

मोहनलाल हे एका वर्षात २८ हिट चित्रपट देणारे एकमेव स्टार आहेत. १९८६ मध्ये मोहनलाल यांचे ३४ चित्रपट रिलीज झाले होते. यापैकी २८ सिनेमे हिट झाले होते. असे अनेक विक्रम मोहनलाल यांच्या नावावर आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेले मोहनलाल केवळ अभिनेते वा निर्मातेच नाहीत तर गायकही आहेत. चार दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांत काम केले आहे.
 

Web Title: 'Pulimurugan' claims in Oscar race India's hope throws up !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.