‘या’ चित्रपटांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला केला विरोध..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 17:22 IST2017-05-23T11:52:08+5:302017-05-23T17:22:08+5:30

अबोली कुलकर्णी आज प्रत्येकच जण भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. लाच देणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली ...

The protest against corruption by 'these' films. | ‘या’ चित्रपटांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला केला विरोध..

‘या’ चित्रपटांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला केला विरोध..

ong>अबोली कुलकर्णी

आज प्रत्येकच जण भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे. लाच देणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासारखंच आहे. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे. नेतेमंडळी, राजकारणी हे याविरोधात भाषणे ठोकण्याव्यतिरिक्त काहीही करत नाहीत. हा भ्रष्टाचार देशातून समूळ नष्ट करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नोटाबंदी’ च्या रूपात एक पाऊल टाकले. त्यामुळे भ्रष्टाचाराला खुप आळा बसला. असाच प्रयत्न बॉलिवूडच्या काही चित्रपटांनी देखील केला. भ्रष्टाचाराला बळी पडल्यावर आयुष्य किती उद्धवस्त होऊ शकते? याचे चित्रण काही चित्रपटांमध्ये करण्यात आले. चला तर मग नजर टाकूयात अशा काही चित्रपटांवर...

                               

दीवार
अमिताभ म्हणतो,‘ मेरे पास बंगला हैं, गाडी हैं, नोकर हैं, चाकर है, तेरे पास क्या है?’ तेव्हा शशी कपूर म्हणतो,‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग आठवला का? ‘दीवार’ चित्रपटातील हा डायलॉग खुप फेमस झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शशी कपूर हे दोघे भाऊ असतात. एक पोलिस आॅफिसर बनतो तर दुसरा भ्रष्टाचारी व्यक्ती बनतो. पण, भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा फार काळ टिकत नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला. 

                                         

खोसला का घोसला
दिल्लीमध्ये राजकारण आणि भ्रष्टाचार कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकतो? याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘खोसला का घोसला’ चित्रपट. जागेवरून सुरू झालेला वाद आणि भ्रष्टाचार यांच्यामुळे सामान्य व्यक्ती किती भरडला जातो? कॉमेडी आणि ड्रामा असे अनोखे मिश्रण असलेला चित्रपट शेवटी ‘भष्टाचार केल्यावर व्यक्तीची किती वाईट अवस्था होते?’ असा संदेश देतो.



रण
‘रण’ हा चित्रपट पॉलिटिकल थ्रिलर आहे. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटात दोन मीडिया हाऊसेस आणि भ्रष्टाचारी राजकारणी यांच्यातील वाद, संघर्ष दाखवण्यात आलेला आहे. भ्रष्टाचारामुळे शेवट वाईटच होतो, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. यात अमिताभ बच्चन, परेश रावळ, सुदीप, रितेश देशमुख, गुल पनाग हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 



लगे रहो मुन्नाभाई
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट रिलीज झाला. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जे तत्त्व आपले स्वातंत्र्यसैनीक पाळत असायचे, ते सध्याच्या भ्रष्टाचारी जगात कुठेतरी हरवले आहे. बिल्डर हॅप्पी सिंग हा सीनियर सिटीझन्ससाठी असलेले घर हिसकावून घेऊ इच्छित असतो. भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेला पैसा त्याला त्याच्या अधोगतीकडे घेऊन जातो. 

राजनीती
राजकारण आणि भ्रष्टाचार या एका नाण्याच्या दोन बाजू. मात्र, कधीकधी भ्रष्टाचाराचा परिणाम वैयक्तिक आयुष्यावरही जास्त होतो. या चित्रपटात भ्रष्टाचार आणि राजनीती यांच्यामुळे व्यक्तिगत जीवनात दुरावा निर्माण होतो. सत्तेत टिकून राहण्यासाठी मग भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब करून ते यशाच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात. पण, तो मार्ग त्यांना त्यांच्या विनाशाकडे घेऊन जातो.

                               

दो दुनी चार
महिन्याला २० हजार रूपये कमावणारा शिक्षक पैसा कमावण्यासाठी कशाप्रकारे सोप्या मार्गांचा अवलंब करतो? काही दिवसांतच श्रीमंत होण्यासाठी ते भ्रष्टाचाराचा मार्ग स्विकारतात. पण, अखेरीस त्यांना समजते की, भ्रष्टाचारापासून चार हात लांब राहणेच चांगले, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

  

Web Title: The protest against corruption by 'these' films.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.