निर्माता विकास मोहन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:14 IST2016-05-31T09:42:45+5:302016-05-31T15:14:16+5:30

निर्माता विकास मोहन यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनुपम खेर, हृतिक रोशन, ...

Producer Vikas Mohan passed away | निर्माता विकास मोहन यांचे निधन

निर्माता विकास मोहन यांचे निधन

र्माता विकास मोहन यांचे मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, अनुपम खेर, हृतिक रोशन, रितेश देशमुख, करण जोहर यांनी ट्विट करुन आपल्या शोकसंवेदना प्रकट केल्या. 
अमिताभ बच्चन: ट्रेड मॅगेझिनचे मालक, ज्येष्ठ पत्रकार विकास मोहन यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील मोठा सदस्य गेल्याची भावना आहे. आज सकाळी टी३एनची पत्रकार परिषद होती. ती रद्द करावी लागली. त्यांच्या निधनाने मी अस्वस्थ झालो आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ऋषी कपूर: माझे जुने मित्र आणि सतत हसतमुख असणाºया विकास मोहन यांना श्रद्धांजली.
अनुपम खेर: विकास मोहन यांच्या निधनाने मला अतिव दु:ख झाले. ट्रेड अनालिस्ट म्हणून ते अत्यंत उत्तम आणि सर्वांना मदत करणारे मित्र होते.
अभिषेक बच्चन: माझे जवळचे मित्र अमुल मोहन आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति मी शोकसंवेदना प्रकट करतो. आज हाऊसफुलच्या प्रमोशनसाठी आमची टीम इंदोरला जाणार होती. ती आम्ही रद्द केली आहे.
हृतिक रोशन: अत्यंत आदरणीय आणि उत्कृष्ट पत्रकार हरपला.
रितेश देशमुख: तुमचे प्रेम, दया आणि करुणेबद्दल आम्ही आभारी आहोत. तुमची उणीव भासेल.
जेनेलिया देशमुख: विकास मोहन यांच्या कुटुंबियांना दु:ख पचविण्याची ताकद मिळो ही प्रार्थना.
करण जोहर: अत्यंत आदरणीय आणि प्रेमळ असणारे विकास हे आमच्या कुटुंबियातील सदस्य होते. त्यांची नेहमीच मदत आणि पाठिंबा मिळाला.
मधुर भांडारकर: विकास मोहन यांच्या निधनाने खुप दु:ख झाले. ते बहिर्मुखी व्यक्तीमत्व होते.
कुणाल कोहली: फिल्म ट्रेडमधील त्यांचे विश्लेषण आणि संघटनेला झालेली त्यांची मदत मोलाची आहे.

Web Title: Producer Vikas Mohan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.