प्रियांका चोपडाने बॉलिवूड पासून हॉलीवूडपर्यंत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. वयाच्या १८ व्या वर्षीच तिने मिस वर्ड चा ...
प्रियांकाने केला आठवणीतील फोटो शेअर
/>प्रियांका चोपडाने बॉलिवूड पासून हॉलीवूडपर्यंत आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. वयाच्या १८ व्या वर्षीच तिने मिस वर्ड चा किताब आपल्या नावावर केला होता. त्याच्या आठवणीतील एक फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोबसोबत तिने लिहीले आहे की,‘ त्यावेळेला मी के वळ १८ वर्षाचे होते’. २००० मध्ये प्रियांकाला या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आज त्याला १६ वर्ष उलटले आहेत. तिने गतवर्षी आपल्या अमेरिका टेलीव्हिजन सीरीज ‘क्वांटिको’ पासून आपले टी.व्ही. करिअर सुरु केले. अमेरिकन सीरीजमध्ये प्रमुख भूमिका करणारी प्रियांका ही आतापर्यंतची पहिली भारतीय आहे. त्याचबरोबर ती लवकर जॉनसन चा चित्रपट ‘बेवॉच’ पासून आपले हॉलीवूड करिअरची सुरुवात करीत आहे. त्याची शुटींगही पूर्ण झाली आहे. यामध्ये प्रियंका ही विक्टोरिया लीड्सच्या निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Priyankhan shared photos of the memories