प्रियांका ‘फन्ने खान’सोबत करणार ‘बॉलिवूड वापसी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:57 IST2016-10-17T13:57:18+5:302016-10-17T13:57:18+5:30
हॉलिवूडमध्ये अपार लोकप्रियता आणि प्रेम मिळवणारी तुमची आमची लाडकी प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये ‘वापसी’ करणार आहे. होय, येत्या डिसेंबरमध्ये हातातले ...

प्रियांका ‘फन्ने खान’सोबत करणार ‘बॉलिवूड वापसी’!
ह लिवूडमध्ये अपार लोकप्रियता आणि प्रेम मिळवणारी तुमची आमची लाडकी प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये ‘वापसी’ करणार आहे. होय, येत्या डिसेंबरमध्ये हातातले सगळे हॉलिवूड प्रोजेक्ट संपपल्यानंतर प्रियांका भारतात परतणार आहे. आता ती भारतात येणार म्हटल्यावर, तिच्या बॉलिवूडमधील ‘वापसी’चीही तुम्हाला प्रतीक्षा असणार. लवकरच ही प्रतीक्षाही संपणार आहे. प्रियांका एका ‘खान’सोबत बॉलिवूडमध्ये परतणार असल्याची खबर आहे. आता हा ‘खान’ कोण? तर ‘फन्ने खान’. राकेश ओम प्रकाश मेहरा निर्मित ‘फन्ने खान’ या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. मेहरा यांनी प्रियांकाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. तिला ती चांगलीच भावलीय. अतुल मांजरेकर हा चित्रपट दिग्दर्शित (पहिला डेब्यू सिनेमा)करणार असल्याचेही कळते. ‘फन्ने खान’ एक म्युझिकल लव्ह स्टोरी असेल. यात तिच्यासोबत अनिल कपूरही दिसेल. तुम्ही-आम्ही सगळेच प्रियांकाला पाहण्यास उत्सूक आहोत. पण शेवटी डिसेंबरपर्यंतची प्रतीक्षा ही आलीच!!