प्रियंकाचे ओबामांसोबत डिनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 16:28 IST2016-05-01T10:58:16+5:302016-05-01T16:28:16+5:30
सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियंका चोपडा हिने शनिवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत रात्रीचे भोजन केले. यावेळी ओबामांच्या ...

प्रियंकाचे ओबामांसोबत डिनर
स ्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियंका चोपडा हिने शनिवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत रात्रीचे भोजन केले. यावेळी ओबामांच्या पत्नी मिशेल यांनाही प्रियंका भेटली. व्हाइट हाऊस करस्पॉन्डण्टच्या वार्षिक भोजनात प्रियंका जुहेद मुराद याने डिझाईन केलेले ब्लॅक गाऊन घालून पोहोचली. ओबामांसोबत भोजन करतानाचे छायाचित्र प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. ओबामांना प्रत्यक्ष भेटण्याचा प्रियंकाचा अनुभव कसा राहिला,असे विचाराल तर प्रियंकाला ओबामा अतिशय चॉर्मिंग आणि फनी वाटले. फनी आणि चार्मिंग बराक ओबामा आणि सुंदर मिशेल ओबामा यांना भेटून चांगले वाटले. सुंदर अशा आयोजनासाठी धन्यवाद. तुमच्या गर्ल्स एज्युकेशन प्रोग्रॅमसोबत काम करणार यासाठी वाट पाहू शकत नाही, असे टिष्ट्वट प्रियंकाने केले. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ओबामा यांचे शेवटचे व्हाइट हाऊस करस्पाँडण्ट डिनर होते. पुढील वर्षी माझ्याठिकाणी दुसरे अध्यक्ष असतील. कोणीही अनुमान लावू शकतो तो कोण असेल? असे यावेळी केलेल्या भाषणात ओबामा म्हणाले.
![]()