प्रियंका चोपडाच्या शॉर्ट ड्रेस वादावर सनी लिओनीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 19:33 IST2017-06-02T14:03:02+5:302017-06-02T19:33:02+5:30

बर्लिन येथे आपल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या अभिनेत्री प्रियंका चोपडाने जर्मनी दौºयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ...

Priyanka Chopra's short dress controversy, Sunny Leone gave 'only' feedback! | प्रियंका चोपडाच्या शॉर्ट ड्रेस वादावर सनी लिओनीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

प्रियंका चोपडाच्या शॉर्ट ड्रेस वादावर सनी लिओनीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

्लिन येथे आपल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या अभिनेत्री प्रियंका चोपडाने जर्मनी दौºयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी प्रियंकाने पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचे काही फोटोज्ही सोशल मीडियावर शेअर केले होते. भेटीदरम्यान प्रियंकाने परिधान केलेल्या शॉर्ट ड्रेसवरून नेटिझन्सनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. आता याच विषयावरून एकेकाळची पॉर्न स्टार अन् आता आयटम गर्ल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी हिनेही प्रियंकाच्या शॉर्ट ड्रेसवर प्रतिक्रिया दिली आहे. 

सनीने म्हटले की, बर्लिन येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता प्रियंकाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र प्रियंकाच्या ड्रेसवर पंतप्रधान मोदी यांनी काही आक्षेप घेतला नाही. मग इतरांनी ऐवढा आक्रोश करण्याची काय गरज? आपण या देशाला एक स्मार्ट प्रधानमंत्री निवडून दिला आहे. जर त्यांना प्रियंकाच्या ड्रेसवर काही आक्षेप असता तर त्यांनी मत करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे मला असे वाटते की, प्रियंकाला इतर कोणोलाही ट्रोल करण्याचा अधिकार नाही. 



पुढे बोलताना सनीने म्हटले की, वास्तविक प्रियंकाच्या ड्रेसवर टीका करण्यापेक्षा तिच्या कामाचे कौतुक करायला हवे. प्रियंका एक स्मार्ट महिला असून, तिला समाजाविषयी बºयाचशा गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे उगाचच प्रियंकावर आगपाखड करू नये, असेही सनीने म्हटले. सनी पेटाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. जेव्हा तिला प्रियंकाच्या ट्रोलिंगवरून विचारण्यात आले तेव्हा तिने माध्यमांना अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली. 

दोन दिवसांपूर्वीच सनी एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी लातूरला आली होती. याठिकाणी तिच्या विमानाला अपघात झाल्याने ती या अपघातातून थोडक्यात बचावली होती. या अपघाताची माहिती खुद्द सनीनेच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करून दिली होती. 

Web Title: Priyanka Chopra's short dress controversy, Sunny Leone gave 'only' feedback!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.