​प्रियांका चोप्राच्या दुस-या हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज! होऊ शकते चाहत्यांची निराशा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 10:42 IST2018-04-15T05:12:10+5:302018-04-15T10:42:10+5:30

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे.लवकरच प्रियांकाचा दुसरा हॉलिवूडपट ‘अ किड लाइक जॅक’ रिलीज होतोय. काही तासांपूर्वी ‘अ किड लाइक जॅक’चा ट्रेलर रिलीज झाला.

Priyanka Chopra's second Hollywood movie trailer release! The disappointment of fans can be !! | ​प्रियांका चोप्राच्या दुस-या हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज! होऊ शकते चाहत्यांची निराशा!!

​प्रियांका चोप्राच्या दुस-या हॉलिवूडपटाचा ट्रेलर रिलीज! होऊ शकते चाहत्यांची निराशा!!

लिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे.लवकरच प्रियांकाचा दुसरा हॉलिवूडपट ‘अ किड लाइक जॅक’ रिलीज होतोय. काही तासांपूर्वी ‘अ किड लाइक जॅक’चा ट्रेलर रिलीज झाला. पण या ट्रेलरमध्ये प्रियांका अगदी काही सेकंदापुरती दिसतेय. साहजिकच, हा ट्रेलर बघितल्यानंतर प्रियांकाच्या चाहत्यांची निराशा होणे पक्के आहे. ट्रेलर बघता, हा चित्रपट एका चिमुकल्या मुलीची व तिच्या पालकांची कथा असल्याचे स्पष्ट होतेय. अनेक भाव-भावनांनी भरलेल्या या ट्रेलरमध्ये प्रियांकाने ‘अमान’ नामक तरूणीची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये ती दोनदा दिसते. पण प्रत्येकवेळी तिच्या वाट्याला केवळ दोन ते तीन सेकंदाचे फुटेज आले आहे. ट्रेलरमधील प्रियांकाचा संवादही नीट ऐकू येत नाहीये. अर्थात चित्रपटाच्या क्रेडिट लिस्टमध्ये प्रियांकाचे नाव आहे.



‘अ किड लाइक जॅक’  हा प्रियांकाचा दुसरा हॉलिवूड चित्रपट आहे. यापूर्वी ती ‘बेवॉच’ या चित्रपटात दिसली होती. यात ती हॉलिवूड सुपरस्टार ड्वेन जॉन्सनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. प्रियांकाने या चित्रपटात खलनायिकेची भूमिका साकारली होती. अर्थात तिचा हा पहिला वहिला हॉलिवूडपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. लवकरच प्रियांका ‘क्वांटिको’च्या तिसºया सीझनमध्ये दिसणार आहे. अलीकडे  ‘क्वांटिको3’चा प्रोमो रिलीज झाला. यात प्रियांका अतिशय जबरदस्त अंदाजात दिसतेय.

ALSO READ : प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये पूर्ण केलीत १६ वर्षे; चाहत्यांनी अशा दिल्या शुभेच्छा!!

‘क्वांटिको’  एक अमेरिकन सीरिज आहे.  सप्टेंबर २०१५ मध्ये या सीरिजची सुरूवात झाली होती. यात प्रियांकाला मुख्य भूमिकेत कास्ट केले गेले होते. त्यामुळे प्रियांका विदेशी मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. या सीरिजने प्रियांकाला विदेशी धर्तीवर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. पुढे ‘क्वांटिको’च्या दुसºया सीझनमध्येही प्रियांकाची वर्णी लागली आणि आता या सीरिजच्या तिसºया सीझनमध्येही प्रियांका झळकत आहे. गेल्या काही वर्षात प्रियांकाने हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण केला आहे.  

Web Title: Priyanka Chopra's second Hollywood movie trailer release! The disappointment of fans can be !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.