प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:28 PM2020-08-18T12:28:42+5:302020-08-18T12:36:11+5:30

प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Priyanka Chopra's big announcement, will reveal things in private life | प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा

प्रियंका चोप्राने केली मोठी घोषणा, खासगी जीवनातील गोष्टींचा करणार खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या बायोग्राफीमुळे चर्चेत आली आहे. लवकरच प्रियंका आपल्या आयुष्यातील गोष्टींचा खुलासा करणार आहे. याबद्दल तिने ट्विटरवर सांगितले आहे. प्रियंकाचा बाॅलिवूडमधला प्रवास, अफेयर्स, निकवरच प्रेम आणि हाॅलिवूडमधील एण्ट्री या आयुष्यातील घडामोडींवर प्रियंका आपल्या पुस्तकातून मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे. प्रियंकाच्या या बहुचर्चित आत्मचरित्राचे नाव अनफिनिशड असणार आहे.

प्रियंकाने ट्विट करत याची माहिती दिली असून पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहे. प्रियंका आपल्या पुस्तकाबाबत म्हणाली की, 'शब्दांना कागदावर छापलेले पाहणे किती सुंदर अनुभव असतो. लवकरच पुस्तक सर्वांच्या भेटीला येईन…'



प्रियंकाने 'पेंग्विन रॅन्डम हाऊस'ला ट्विटमध्ये टॅग केल्याने पेंग्विन प्रकाशनाकडून तिचे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. मात्र प्रियंकाने अद्याप याबाबत कोणताच खुलासा केलेला नाही.



यापूर्वी प्रियंकाने एक ट्विट केले होते ज्यात तिने सांगितले होते की तिचे पुस्तक छापण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रियंकाने ट्विटमध्ये लिहिले की, अनफिनिशड आता पूर्ण झाले आहे. फायनल लेखन पाठवण्याच्या स्थितीत आहे. तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी वाट पाहू शकत नाही.



प्रियंका चोप्राने जीवनात बऱ्याच गोष्टी आहेत जे जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल. तिने वयाच्या 17 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. तसेच हॉलिवूडमधील तिचा प्रवास वाखणण्याजोगा आहे. त्यामुळे तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Priyanka Chopra's big announcement, will reveal things in private life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.