गुड लुकिंग नव्हती प्रियंका चोप्रा, 'अंदाज'साठी अभिनेत्रीने केलेली नाकाची सर्जरी, दिग्दर्शकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:46 IST2025-07-10T17:45:36+5:302025-07-10T17:46:14+5:30
Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा आज एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.

गुड लुकिंग नव्हती प्रियंका चोप्रा, 'अंदाज'साठी अभिनेत्रीने केलेली नाकाची सर्जरी, दिग्दर्शकाचा खुलासा
प्रियांका चोप्रा (Bollywood Actress Priyanka Chopra) आज एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. तिने अनेक हॉलिवूड चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर लगेचच प्रियांका चोप्राने सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. तिचा पहिला हिंदी चित्रपट अनिल शर्माचा 'हिरो: द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय' होता. या चित्रपटात प्रियांका सनी देओल आणि प्रीती झिंटासोबत दिसली होती.
त्यादरम्यान अभिनेत्रीला अक्षय कुमार आणि लारा दत्तासोबत 'अंदाज'मध्ये कास्ट करण्यात आलं होतं. मात्र, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, नाकाचा पॉलिप हटवण्यासाठी नाकाची सर्जरी करावी लागली. डॉक्टरांनी चुकून तिच्या नाकाचा खालचा भाग कापला, ज्यामुळे तिचा चेहरा बदलला. आता 'अंदाज'चे निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की त्यांनी प्रियांकाला नाकाची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते.
"ती पारंपारिकपणे सुंदर नव्हती, पण...''
मिनिट्स ऑफ मसालाशी अलीकडेच झालेल्या मुलाखतीत सुनील दर्शन यांनी खुलासा केला की, प्रियांका त्यावेळी सौंदर्याच्या पारंपारिक साच्यात बसत नसली तरी, ती इतर कारणांमुळे वेगळी दिसली. त्यांनी म्हटले की, "ती पारंपारिकपणे सुंदर नव्हती, परंतु तिच्याकडे एक प्रभावी व्यक्तिमत्व आणि आकर्षक आवाज होता." ते पुढे म्हणाले की, अंदाजच्या सेटवर अक्षय आणि लारा लक्ष केंद्रित असतानाही तो नेहमीच तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवत असे. तो म्हणाला की अंदाज करण्यापूर्वी त्याने प्रियांका चोप्राला तिचे नाक दुरुस्त करण्यास सांगितले होते.
दिग्दर्शकानेच सांगितलं होतं प्रियांकाला नाकाची शस्त्रक्रिया करायला
सुनील दर्शन म्हणाले, "अंदाज सिनेमा करण्यापूर्वी मी तिला सांगितले होते की तिने तिच्या नाकाच्या ब्रीजबद्दल काहीतरी करावे." प्रियांकाने त्यांचा सल्ला मानला तेव्हा तो खूप प्रभावित झाला. "तिला माहित होते की ते आवश्यक आहे आणि तिचे पालक खूप चांगले डॉक्टर होते. ही समस्या नव्हती, त्यांनी ती लगेच दुरुस्त केली," सुनील म्हणाला. प्रियांकाने नंतर पुष्टी केली की शस्त्रक्रिया सायनसच्या समस्येशी संबंधित होती. मात्र तिने हे देखील कबुल केले की, ऑपरेशन चुकीचं झालं, ज्यामुळे तिचे बॉलिवूड पदार्पण जवळजवळ थांबले होते.
२००३ मध्ये रिलीज झालेला 'अंदाज'
२००३ मध्ये रिलीज झालेल्या 'अंदाज' चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार व्यतिरिक्त लारा दत्ता देखील मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात पंकज धीर, जॉनी लिव्हर, माया अलाघ यांच्यासह अनेक कलाकारांनी सहाय्यक भूमिका केल्या होत्या. सुनील दर्शन निर्मित हा चित्रपट लव्ह ट्रँगलवर आधारीत होता. त्यातील गाणी आणि भावनिक कथानकामुळे 'अंदाज' प्रेक्षकांचा आवडता चित्रपट बनला आणि या चित्रपटाने प्रियंका आणि लाराच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले.