‘नेपोटिझम’वर बोलली प्रियांका चोप्रा; मला चित्रपटातून अक्षरश: हाकलून लावले गेले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 14:31 IST2017-05-01T08:45:15+5:302017-05-01T14:31:30+5:30
गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये पाय रोवणे अशक्य आहे, असे म्हटले जाते. पण यालाही अपवाद आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा याला अपवाद ...

‘नेपोटिझम’वर बोलली प्रियांका चोप्रा; मला चित्रपटातून अक्षरश: हाकलून लावले गेले...!
ग डफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये पाय रोवणे अशक्य आहे, असे म्हटले जाते. पण यालाही अपवाद आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा याला अपवाद म्हणता येईल. प्रियांकाने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. आज प्रत्येकजण तिला रोल मॉडेल मानतं, ते त्याचमुळे. पण बॉलिवूडमध्ये पाय रोवणे प्रियांकासाठी सोपे नव्हते. एक काळ असा होता, जेव्हा तिला चित्रपटातून उचलून फेकले गेले होते.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण खुद्द प्रियांकाने हे सांगितले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये ‘नेपोटिझम’वर(नातेवाईकांसाठी, सगेसोयºयांसाठी केलेली वशिलेबाजी) जोरदार चर्चा सुरु आहे. या डिबेटबद्दल तुझे काय मत आहे, असे प्रियांकाला एका मुलाखतीत विचारण्यात आले. यावर प्रियांकाने जे बोलली ते धक्कादायक होते.
इंडस्ट्रीत हर तºहेचे लोक आहेत. एका मोठ्या स्टारच्या घरात जन्म घेणे यात काहीही वाईट नाही. आऊटसाइडर्सला एन्ट्री मिळत नाही आणि स्टारकिड्सवर त्यांच्या घराण्याचे नाव राखण्याचा दबाव असतो. प्रत्येकाचा एक प्रवास असतो. माझा प्रवास म्हणाल तर मी बरेच काही सहन केले आहे. प्रोड्यूसरकडे दुसºया एका अभिनेत्रीची शिफारस करण्यात आली होती, म्हणून माझी चित्रपटातून हकालपट्टी केली गेली होती. त्यावेळी मी खूप रडले होते. पण अखेर हा इंडस्ट्रीचा भाग आहे, हे मी शिकले. शेवटी ज्यांच्यांवर सक्सेस स्टोरी बनायच्या त्या बनतातच. मग काहीही होवो, असे प्रियांका म्हणाली. एकंदर काय तर उपेक्षा, अपमान, अपयश असे सगळे काही सहन करून प्रियांका आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.
ALSO READ : प्रियांका चोप्राच्या 'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज
तूर्तास प्रियांका ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा हा हॉलिवूडपट रिलीज होणार आहे.