काय सांगता,सलमान-हृतिक नाही तर इंटरनेटवर 'या' तीन अभिनेत्रीच आहेत मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी, कोण आहे ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 04:23 PM2020-05-09T16:23:08+5:302020-05-09T16:23:21+5:30

अभिनेत्रींप्रमाणे सलमान आणि हृतिक रोशनची देखील क्रेझ कायम आहे. सलमान खानला २१ लाख वेळा तर हृतिक रोशनला १३ लाख वेळा सर्च केले गेले आहे.

Priyanka Chopra, Sunny Leone and Katrina Kaif top most searched celebrities in Bollywood-SRJ | काय सांगता,सलमान-हृतिक नाही तर इंटरनेटवर 'या' तीन अभिनेत्रीच आहेत मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी, कोण आहे ते?

काय सांगता,सलमान-हृतिक नाही तर इंटरनेटवर 'या' तीन अभिनेत्रीच आहेत मोस्ट सर्च इंडियन सेलिब्रिटी, कोण आहे ते?

googlenewsNext

बॉक्स ऑफिसवर सनी लिओनीचे चित्रपट काही खास कमाल करू शकले नसले तरीही  इंटरनेटवर मोस्ट सेलिब्रेटींमध्ये तीन अभिनेत्रींची नावे आघाडीवर आहेत. त्यात सनी लिओनीच्याही नावाचा समावेश आहे. नुकताच एक सर्व्हे करण्यात आला यात इंटरनेटवर फक्त याच तीन अभिनेत्रींचा बोलबाला असल्याचे समोर आले आहे. या यादीतील प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे देसी गर्ल प्रियंका चोप्राचा. प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रसिद्ध आहे. रिपोर्टनुसार प्रियंका चोप्राला इंटरनेटवर 39 लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. 

प्रियंका नंतर सनी लियोनीचा नंबर लागतो. ती नेहमी आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. सनी लिओनीला इंटरनेटवर ३१ लाख वेळा सर्च करण्यात आले आहे. सनी नंतर तिस-या क्रमांकावर आहे कॅटरिना कैफ, कॅटरिनादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कॅटरिनालादेखील इंटरनेटवर १९ लाख वेळा सर्च केले गेले आहे. तर अभिनेत्रींप्रमाणे सलमान आणि हृतिक रोशनची देखील क्रेझ कायम आहे. सलमान खानला २१ लाख वेळा तर हृतिक रोशनला १३ लाख वेळा सर्च केले गेले आहे. 


तर लॉकडाऊन दरम्यान कनिका कपूर सर्वाधिक सर्च सेलिब्रिटी बनली होती. तर  रामानंद सागरची मालिका 'रामायण' देखील सर्वाधिक सर्च लिस्टमध्ये स्थान मिळवले होते.फेसबुक, ट्विटर किंवा युट्यूब प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईट्सवर यांनीच सगळ्यात जास्त धुमाकुळ घातला होता.

Web Title: Priyanka Chopra, Sunny Leone and Katrina Kaif top most searched celebrities in Bollywood-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.