​प्रियांका चोप्राला आजही होतो ‘या’ एकाच गोष्टीचा पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 11:03 IST2017-09-08T05:33:47+5:302017-09-08T11:03:47+5:30

प्रियांका चोप्रा आज यशाच्या शिखरावर आहे. येथून मागे वळून पाहताना प्रियांकाला एका गोष्टीचा मोठा पश्चाताप होतोय.  कसला? तर फेअरनेस ...

Priyanka Chopra still happens today! | ​प्रियांका चोप्राला आजही होतो ‘या’ एकाच गोष्टीचा पश्चाताप!

​प्रियांका चोप्राला आजही होतो ‘या’ एकाच गोष्टीचा पश्चाताप!

रियांका चोप्रा आज यशाच्या शिखरावर आहे. येथून मागे वळून पाहताना प्रियांकाला एका गोष्टीचा मोठा पश्चाताप होतोय.  कसला? तर फेअरनेस क्रिमच्या जाहिराती केल्याचा. एका टीव्ही मुलाखतीत प्रियांकाने स्वत: याबद्दल खुलासा केलाय. यानिमित्ताने ती पुन्हा एकदा वर्णभेदावर  बोललीय.
पंधरा वर्षांच्या वयापर्यंत मी बरीच सावळी होते. माझी कायम इतर गोºया  मुलींशी तुलना व्हायची. ही तुलना मला आरपार दुखवून जायची, असे प्रियांकाने सांगितले.
वर्णभेदाच्या मुद्यावर भारत आणि अमेरिका यापैकी सर्वाधिक असुरक्षित कुठे वाटते? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला. यावर प्रियांकाने भारत, असे उत्तर दिले. माझ्या मते, या मुद्यावर मी भारतात अधिक असहज असते. कारण भारतात आजही गोºया रंगांच्या मुलींनाच सुंदर मानले जाते. भारतात फेअरनेस क्रिमचा मोठा प्रचार होतो. रंग उजळण्यासाठी हे क्रिम वापरा, अमुक करा, असे जणू प्रत्येक क्रिमच्या जाहिरातीत सांगितले जाते. मी सुद्धा एका फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. अर्थात तेव्हा मी फार लहान होते. अनेक वर्षांनंतर मी जेव्हा ती जाहिरात पाहिली तेव्हा मला चांगलाच पश्चाताप झाला. हे मी काय केले? असा प्रश्न  मी स्वत:लाच विचारला. यानंतर मी माझ्या सावळ्या रंगाच्या प्रेमातच पडले,असे प्रियांका म्हणाली. आज मला माझ्या सावळ्या रंगाचा अभिमान आहे, असेही ती म्हणाली.

ALSO READ : Latest Photoshoot : पाहाच, कधीही न पाहिलेली प्रियांका चोप्रा!

काही दिवसांपूर्वी अभिनेता अभय देओल यानेही फेअरनेस क्रिमच्या जाहिरातींबद्दल काहीसे असेच मत व्यक्त केले होते. फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करणाºया बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने आरोपीच्या पिंजºयात उभे केले होते. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला तोंड फुटले होते.
 

Web Title: Priyanka Chopra still happens today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.