नाकाच्या सर्जरीमुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते सात चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:30 IST2018-06-06T07:55:59+5:302018-06-06T13:30:25+5:30

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. स्वत:पेक्षा १० वर्षांपेक्षा लहान असलेला अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यासोबत  प्रियांका ...

Priyanka Chopra lost seven films because of her nose surgery | नाकाच्या सर्जरीमुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते सात चित्रपट!!

नाकाच्या सर्जरीमुळे प्रियांका चोप्राला गमवावे लागले होते सात चित्रपट!!

रियांका चोप्रा सध्या तिच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. स्वत:पेक्षा १० वर्षांपेक्षा लहान असलेला अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यासोबत  प्रियांका डेट करतेय, अशी चर्चा आहे. याच चर्चेतदरम्यान प्रियांकाची बॉयोग्राफी चर्चेत आली आहे. ‘प्रियांका चोप्रा: द डार्क हॉर्स’ ही बायोग्राफी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पत्रकार भारती प्रधान  लिखीत  या बायोग्राफीत प्रियांकाचा अख्खा बॉलिवूड प्रवास वर्णन करण्यात आला आहे. आज प्रियांका इंटरनॅशनल स्टार झाली आहे. आपल्या टॅलेंटच्या भरवशावर प्र्रियांकाने हे स्थान मिळवले आहे. याच प्रियांकाच्या हातून बॉलिवूड डेब्यूआधी अनेक चित्रपटाच्या आॅफर्स निसटल्या होत्या. याचा तिला प्रचंड पश्चाताप होता. प्रियांकाच्या बायोग्राफीतून ही बाब समोर आली आहे.



होय,  प्रियांकाने सनी देओल आणि प्रीति झिंटाच्या ‘हिरो’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात ती सेकंड लीड होती. पण त्याआधी प्रियांकाच्या हातून अनेक चित्रपट गेलेत.  बायोग्राफीत हा सगळा किस्सा सांगितला गेल्या आहे. त्यानुसार, प्रियांकाला सर्वप्रथम विजय गलानींचा एक चित्रपट आॅफर झाला होता. त्या चित्रपटाचे नाव ठरले नव्हते. पण महेश मांजरेकर तो दिग्दर्शित करणार होते. या चित्रपटात प्रियांकाच्या अपोझिट बॉबी देओलला कास्ट करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शूटींग सुरू झाले.

याचदरम्यान प्रोड्यूसर गलानी प्रियांकाला भेटायला तिच्या मेकअप व्हॅनमध्ये पोहोचले आणि हिरोईनचे नाक पाहून त्यांना धक्का बसला.  या चित्रपटाच्या शूटींगआधी प्रियांका लंडनमध्ये नाकाची सर्जरी केली होती. त्यामुळे तिच्या नाकाचा आकार काहीसा विचित्र भासत होता. गलानी ते पाहून चिंतेत पडले. चित्रपटाचे थोडे शूटींग झाले होते आणि पुढील शेड्यूल लंडनमध्ये होते. पण प्रियांकाच्या नाकाचा शेप पाहून गलानींनी पुढचे शूटींग थांबवले. प्रियांकाला विश्वास होता की, महिनाभरात पुढच्या शेड्यूलआधी तिच्या नाकाची शेप योग्य होईल. पण एक महिना गेला तरी तिच्या नाकाचा शेप म्हणावा तसा योग्य झाला नाही. त्यातच तिच्यासोबत असलेल्या बॉबी देओललाही तिच्या नाकाचा शेप खटकू लागला. तिच्या लूकमुळे बॉबी प्रियांकासोबत काम करण्यास राजी नव्हता. बॉबीने तर पैसे परत करण्याचीही तयारी दाखवली होती. महेश मांजरेकरचे चित्रपटही त्याकाळी फ्लॉप चालले होते. त्यांची मार्केट व्हल्यू  घसरली होती. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे, हा चित्रपट  चित्रपट थंडबस्त्यात पडला. पुढे या बिघडलेल्या नाकाच्या आकारामुळेच प्रियांकाला सात ते आठ चित्रपट गमवावे लागल्याचेही या बायोग्राफीत नमूद आहे. अनिल शर्मानी ‘हिरो’साठी प्रियांकाला साईन केले होते. पण तेही तिला काढायच्या तयारीत होते. ऐनकेनप्रकारे अनिल शर्मा मानले आणि त्यांनी सेकंड हिरोईन म्हणून तिला चान्स दिला आणि बॉबीसोबत नाही तर त्याचा भाऊ सनी देओलसोबतच्या चित्रपटातून प्रियांकाचा बॉलिवूड डेब्यू झाला.

ALSO READ : ‘क्वांटिको3’मध्ये भारतीयांना दाखवले अतिरेकी! ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रावर निघाला लोकांचा राग!!

Web Title: Priyanka Chopra lost seven films because of her nose surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.