प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:25 PM2024-03-02T15:25:44+5:302024-03-02T15:26:16+5:30

Priyanka Chopra : अखेर प्रियंका चोप्राने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत होते आणि आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Priyanka Chopra has announced a new film, 'The Bluff' which will see the actor in the lead role | प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

अखेर प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra)ने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत होते आणि आता त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. मात्र, प्रियंकाने जाहीर केलेला नवा चित्रपट हिंदी नसून हॉलिवूडचा आहे, ही गोष्ट थोडी निराशाजनक आहे. म्हणजेच सध्या प्रियंका बॉलिवूडमध्ये दिसणार नाही. प्रियंका चोप्राच्या नव्या चित्रपटाचे नाव 'द ब्लफ' आहे. यामध्ये ती अभिनेता कार्ल अर्बनसोबत दिसणार आहे.

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तिने एका बातमीच्या लेखाचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये 'द ब्लफ' चित्रपटाचा उल्लेख होता. तिने असेही लिहिले की, 'मला आशा होती की जर मी जिवंत राहिले आणि देवाची इच्छा असेल तर मला समुद्री डाकू बनण्याची संधी मिळेल.'

'द ब्लफ'बद्दल
द ब्लफची कथा १९व्या शतकातील कॅरिबियन टप्प्यावर आधारित आहे आणि ती एका माजी महिला समुद्री डाकूभोवती फिरते. यामध्ये प्रियांका चोप्रा एका समुद्री डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात, तिचे पात्र जेव्हा तिच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिच्या भूतकाळातील गूढ पाप तिला जखडून ठेवतात. फ्रँक ई. फ्लॉवर्स द ब्लफ दिग्दर्शित करतील. बॉब मार्ले: वन लव्ह या सुपरहिट चित्रपटाने तो प्रसिद्धीच्या झोतात आला, ज्याचा तो सह-लेखक होता.

प्रियंकाच्या नव्या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता
'द ब्लफ'ची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, मात्र आता अभिनेत्रीने याला दुजोरा दिला आहे. अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर वर्कआउट करताना स्वतःचा एक मिरर सेल्फी शेअर केला आणि लिहिले की ती सेटवर परत आली आहे. तिने काम सुरू केले आहे. त्या पोस्टमुळे चाहते उत्सुक झाले आहेत.

आगामी प्रोजेक्ट
रिपोर्ट्सनुसार, द ब्लफचे निर्माते ऑस्ट्रेलियात याचे शूटिंग करण्याचा विचार करत आहेत. मात्र, अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. या चित्रपटाशिवाय प्रियंका ती प्रोड्यूस करत असलेल्या टू किल अ टायगर या डॉक्युमेंट्रीसाठीही चर्चेत आहे. 'हेड ऑफ स्टेट' आणि 'सिटाडेल २' या हॉलिवूड चित्रपटांमध्येही ती दिसणार आहे.

Web Title: Priyanka Chopra has announced a new film, 'The Bluff' which will see the actor in the lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.