प्रियांका चोप्राला हॉलिवूडमध्ये गगन ठेंगणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:02 IST2016-01-16T01:19:12+5:302016-02-09T10:02:58+5:30
लॉस एन्जेलिस येथे एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रा चकितच झाली. 'व्हीएच१'तर्फे २0१५ युरोप म्युझिक अवॉर्डसाठी नामांकन मिळाल्याबद्दल तिला प्रतिक्रिया विचारण्यात ...
.jpg)
प्रियांका चोप्राला हॉलिवूडमध्ये गगन ठेंगणे
ल स एन्जेलिस येथे एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रा चकितच झाली. 'व्हीएच१'तर्फे २0१५ युरोप म्युझिक अवॉर्डसाठी नामांकन मिळाल्याबद्दल तिला प्रतिक्रिया विचारण्यात आली. तर तिला काही सूचलेच नाही. गंमत म्हणजे उत्तम अभिनयाच्या विभागात आपले नामांकन झाले आहे, ही माहिती तिच्यासाठी नवी होती. तिला विश्वासच बसत नव्हता. 'मेल्टडाऊन' मधील अभिनयासाठी तिचे नामांकन झाले असून तिच्या स्पर्धेत टेलर स्विफ्ट, जेम्स रीड, एड शीरन आणि रुबी रोझ हेही आहेत. प्रियांका म्हणाली, हे नामांकन होणे हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. माँट्रियल येथील 'मिरर'ला तिने ही मुलाखत दिली आहे. ३३ वर्षीय ही अभिनेत्री म्हणाली, लहान मुलांना व्हावा तसा आनंद मला झाला आहे. बॉलिवूडमध्ये माझे जे नाव आहे, त्याला साजेसे काम मिळावे यासाठी माझा प्रयत्न होता. लंडनमधील अंजुला अचारिया हिने एबीसीचे अध्यक्ष पॉल ली यांना माझ्याबद्दल सांगितले आणि मला संधी मिळाली. माझे वेगळेपण जपण्याचा माझा प्रयत्न आहे. हुबेहुब माझ्यासारखी दिसणारी कुणीच नसावी, असेच मला वाटते.