बाबो..! या कामासाठी विराट कोहली पेक्षा जास्त मानधन घेते प्रियंका चोप्रा, इतके कोटी घेते मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 14:01 IST2021-01-29T14:01:18+5:302021-01-29T14:01:43+5:30
नुकताच प्रियंका चोप्राचा 'द व्हाइट टायगर' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.

बाबो..! या कामासाठी विराट कोहली पेक्षा जास्त मानधन घेते प्रियंका चोप्रा, इतके कोटी घेते मानधन
सोशल मीडियाचा वापर विशेष करून सेलिब्रेटींचे अपडेट घेण्यासाठी आणि फोटो व व्हिडीओ पाहण्यासाठी केला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का, की सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मोठ्या कलाकारांना चांगले मानधन मिळते. विराट कोहली आणि प्रियंका चोप्रा सारखे सेलिब्रेटी सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी कोटींच्या घरात मानधन घेतात.
प्रियंका चोप्राने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. प्रियंका इंस्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी जवळपास २.१८ कोटी रुपये मानधन घेते. क्रिकेटर विराट कोहलीदेखील इतके मानधन घेत नाही.
काही दिवसांपूर्वी Hopper HQ ने २०२०मधील इंस्टाग्रामवरील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती. ज्यात इंस्टाग्रामवरील स्पॉन्सर्ड पोस्टच्या कमाईबद्दल सांगण्यात आले होते. या यादीत प्रियंका चोप्राच्या नावाचा देखील समावेश होता. त्याच्यानुसार प्रियंका एका पोस्टमागे दोन कोटींहून जास्त फी घेते.
या यादीत दुसरा भारतीय सेलिब्रेटी म्हणून क्रिकेटर विराट कोहलीच्या नावाचा समावेश होता. विराट एक इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी १.३५ कोटी मानधन घेतो.
प्रियंका चोप्रा इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोव्हर्स असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिचे इंस्टाग्रामवर ५९.९ मिलियन लोक फॉलो करतात. प्रियंकाचे दोन इंस्टा हॅण्डल आहे. एक तिची टीम प्रोफेशनल कामासाठी वापरते तर दुसरे अकाउंट प्रियंका खासगी गोष्टींसाठी वापरते.
प्रियंका चोप्राचा नुकताच द व्हाईट टायगर सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.