आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:57 PM2023-04-05T13:57:40+5:302023-04-05T14:01:09+5:30

लेकीच्या जन्मानंतर प्रियांका पहिल्यांदाच तिला भारतात घेऊन आली आहे. चिमुकल्या मालती मेरीची झलक पाहून चाहते खूश झालेत.

Priyanka chopra baby malti enjoys with nani madhu at mumbai house looks cute in printed frock | आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल

आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल

googlenewsNext

ग्लोबल स्टार प्रियंका(Priyanka Chopra)  चोप्रा सध्या तिचा कोस्टार रिचर्ड मेडनससोबत नसह तिच्या आगामी वेब शो 'सिटाडेल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'देसी गर्ल' भारतात आहे आणि तरीही ती तिच्या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये बिझी व्यस्त आहे. प्रियंका तिच्या व्यावसायिक कामात बिझी असताना, तिची आई मधु चोप्रा त्यांच्या तिच्या लेकीची काळजी घेत आहे.


 मधु चोप्रा यांनी नात मालतीसोबतचा एक सुपर क्यूट फोटो त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. फोटोंमध्ये दोघी एकमेकांकडे पाहत आहेत. मधू यांनी मालतीला कडेवर घेतलं आहे. मालती आणि आजीचा हा फोटो सुपरक्युट आला आहे.  प्रिंटेड फ्रॉकमध्ये मालती खूपच गोड दिसतेय. प्रियांकाच्या क्युट लेकीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.


मुंबईत आयोजित एका प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रियंकाने हजेरी लावली.  सध्या ती भारतात तिची हॉलिवूड फिल्म 'सिटाडेल'चं प्रमोशन करत आहे. कोस्टार रिचर्ड मेडनससोबत तिने प्रेस कॉन्फरन्सला संबोधित केले. यावेळी ती म्हणाली,,'मला जे लोक आवडत नाहीत त्यांच्यासोबत मी आता काम करत नाही. याबाबतीत मी जराही तडजोड करणार नाही. जे लोक माझ्या भोवताली आहेत त्यांचाच मला आदर आहे. त्यांच्या बरोबर मला काम करायचं आहे. बऱ्याच काळापासून मी हे करत आहे. मला कामवर जाताना उत्साह वाटला पाहिजे. ज्यांच्यासोबत मला काम करायचे आहे त्यांना भेटायला जाताना मी नोट्स लिहिते.' आता असं बोलून प्रियांकाचा रोख नेमका कुणाकडे आहे याचा अंदाज येतो. 

 लेकीच्या जन्मानंतर प्रियांका पहिल्यांदाच तिला भारतात घेऊन आली आहे. प्रियांका काही दिवस भारतात असून तिच्यासोबत लेक मालती मेरी देखील पहिल्यांदाच भारतात आली आहे. चिमुकल्या मालती मेरीची झलक पाहून चाहते खूश झालेत. तसंच सध्या प्रियांकाची चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 
 

Web Title: Priyanka chopra baby malti enjoys with nani madhu at mumbai house looks cute in printed frock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.