शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा अन् दीपिका पादुकोणचे झाले भांडण, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 19:30 IST2018-05-05T14:00:22+5:302018-05-05T19:30:31+5:30

एका गाण्याची शूटिंग करतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये दीपिका आणि प्रियांका एकमेकींशी भांडताना दिसत आहेत.

Priyanka Chopra and Deepika Padukone's fight during the shoot, watch the video! | शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा अन् दीपिका पादुकोणचे झाले भांडण, पाहा व्हिडीओ!

शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्रा अन् दीपिका पादुकोणचे झाले भांडण, पाहा व्हिडीओ!

लिवूड अभिनेत्रींमध्ये कॅटफाइटची चर्चा नेहमीच कानावर पडत असते. अशीच काहीशी कॅटफाइट देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि मस्तानी दीपिका पादुकोणमध्ये झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोघींमध्ये हा वाद ‘बाजीराव मस्तानी’ या सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाला होता. दोघी खुर्चीवर एकमेकींकडे पाठ फिरवून बसलेल्या असतानाच त्यांच्यात बाचाबाची झाली. पुढे त्याचे रूपांतर भांडणात झाले. सध्या त्याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्या दोघी भांडताना दिसत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या दोघीही एकमेकांच्या अपोझिट बसलेल्या दिसत आहेत. काही वेळानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला दोघी एकमेकांवर हात उचलतात. त्यानंतर दोघींमध्ये शाब्दिक चकमक होते. पुढे तर दीपिका चक्क प्रियांकावर चाकू उगारते. आता तुम्ही म्हणाल की, हे सर्व खरं आहे काय? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सर्व वाद शूटिंगवेळीच्या चेष्टामस्करीदरम्यानचा आहे. दोघीही एकमेकींसोबत खोटंखोटं भांडण्याचा अभिनय करीत असतात. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात हा सर्व प्रकार घडतो. 
 

गाण्याची शूटिंग करीत असताना प्रियांका आणि दीपिका दमतात आणि खुर्चीवर जाऊन बसतात. याचदरम्यान, प्रियांका आणि दीपिका चेष्टामस्करीत एकमेकींशी वाद घालण्याचा एकप्रकारचा अभिनय करतात. या चित्रपटात या दोघींव्यतिरिक्त रणवीर सिंग याची मुख्य भूमिका आहे. 

Web Title: Priyanka Chopra and Deepika Padukone's fight during the shoot, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.