प्रियांका चोप्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही होऊ शकतो संताप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 16:31 IST2018-06-10T10:56:36+5:302018-06-10T16:31:36+5:30

प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. यावेळी तिने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे प्रेक्षकांचाच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही तिच्यावर संताप होऊ शकतो.

Priyanka Chopra again in controversy; Not only audiences but Bollywood actresses too can be angry! | प्रियांका चोप्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही होऊ शकतो संताप !

प्रियांका चोप्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही होऊ शकतो संताप !

लिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा अजून ‘क्वांटिको’ वादातून पूर्णपणे बाहेर पडली नसतानाच पुन्हा एकदा ती वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. होय, नुकतेच माध्यमांशी बोलताना तिने बॉलिवूडवर एक वक्तव्य केले. ज्यास लोकांनी खूपच लाजिरवाणे असे म्हटले आहे. याबाबतचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका पत्रकाराशी बोलताना प्रियांका म्हणतेय की, ‘इंडियन फिल्म्स इज आॅल अबाउट हिप्स अ‍ॅण्ड बूब्स.’ प्रियांकाच्या या वक्तव्यानंतर तिला लोकांनी पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

एकीकडे प्रियांकाच्या या वक्तव्याला खूपच लाजिरवाणे म्हणत आहेत. तर दुसरीकडे प्रियांकाला बॉलिवूडमधून लोकप्रियता मिळाली आहे; मात्र तेही आता विसरताना दिसत असल्याचेही लोक म्हणत आहेत. त्याचबरोबर प्रियांकाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रींच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांचा प्रियांकावर संतापही होण्याचेही नाकारता येत नाही. दरम्यान, याअगोदर प्रियांका चोप्रा तिच्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेच्या सिझन-३ मधील एका एपिसोडमुळे वादाच्या भोवºयात सापडली होती. या एपिसोडमध्ये भारतीय राष्ट्रवाद्यांना दहशतवादी म्हणून दाखविले होते. त्यामुळे प्रियांकाला सोशल मीडियावर लोकांनी चांगलेच सुनावले होते. 
 

लोकांचा वाढता रोष बघता प्रियांकाने एक ट्विट करून याबाबतचे स्पष्टीकरण दिले होते. तिने लिहिले होते की, ‘मी खूपच दु:खी असून, मला त्याचा पश्चाताप होत आहे. या एपिसोडमुळे बºयाच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. मी सर्वांची जाहीर माफी मागते. मला भारतीय असल्याचा गर्व आहे. 

दरम्यान, या वादावर पडदा टाकण्यासाठी क्वांटिकोच्या निर्मात्यांनीही जाहीर माफी मागितली होती. एबीसी नेटवर्कने ट्विटच्या माध्यमातून माफी मागताना प्रियांकावर व्यक्त केला जात असलेला संताप चुकीचा असल्याचा म्हटले. त्याचबरोबर प्रियांकाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते; मात्र आता पुन्हा एकदा प्रियांका वादाच्या भोवºयात सापडताना दिसत असल्याने लोक तिच्याविषयी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Priyanka Chopra again in controversy; Not only audiences but Bollywood actresses too can be angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.