प्रियंका चोपडाला मुंबई विमानतळावर तासन्तास करावी लागली फ्लाइटची प्रतीक्षा, संताप झाला अनावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 21:46 IST2017-12-24T15:34:35+5:302017-12-24T21:46:59+5:30

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या भारतात असून, आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस एन्जॉय करीत आहे. परंतु भारतात आल्याबरोबरच प्रियंकाला मनस्ताप सहन ...

Priyanka Chopda had to make an hour at the Mumbai airport waiting for the flight; | प्रियंका चोपडाला मुंबई विमानतळावर तासन्तास करावी लागली फ्लाइटची प्रतीक्षा, संताप झाला अनावर!

प्रियंका चोपडाला मुंबई विमानतळावर तासन्तास करावी लागली फ्लाइटची प्रतीक्षा, संताप झाला अनावर!

सी गर्ल प्रियंका चोपडा सध्या भारतात असून, आपल्या परिवारासमवेत ख्रिसमस एन्जॉय करीत आहे. परंतु भारतात आल्याबरोबरच प्रियंकाला मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. प्रियंकाने तिचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये ती चांगलीच त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. गेल्या तीन तासांपासून प्रियंका फ्लाइटची प्रतीक्षा करीत आहे. यावेळी प्रियंकासोबत तिची मम्मी मधू चोपडा आणि भाऊ सिद्धार्थ चोपडा हेदेखील दिसत आहेत. या सगळ्यांच्याच चेहºयावर संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. 



दरम्यान, प्रियंकाने या सर्व प्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर केला असून, तो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ती खूपच त्रस्त असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ती हे सांगत आहे की, गेल्या तीन तासांपासून मी आणि माझी फॅमिली मुंबई विमानतळावर फ्लाइटची प्रतीक्षा करीत आहे. आम्हाला बरेली येथे जायचे आहे. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही की, आम्ही बरेलीला पोहोचणार की नाही?



व्हिडीओमध्ये ती तिच्या चाहत्यांसाठी एक पोलही चालविताना दिसत आहे. ज्यामध्ये तिने विचारले की, ‘मी बरेलीला पोहोचणार की नाही, येस किंवा नोमध्ये उत्तर द्या!’ प्रियंकाला तिच्या होमटाउन बरेली येथे डॉक्टरेट या उपाधीने सन्मानित करण्यात आले. याचसंदर्भात ती बरेलीला जात होती. बरेली इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती केशव कुमार अग्रवाल यांनी तिला ही डिग्री देऊन सन्मानित केले. दरम्यान, प्रियंका तब्बल पाच वर्षांनंतर तिच्या होमटाउनला जात होती. तिचे लहानपण उत्तर प्रदेशातील बरेली येथेच गेले. 



दरम्यान, प्रियंका युनिसेफची गुडविल अ‍ॅम्बेसेडर असून, तिने याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रियंका लवकरच A Kid Like Jake आणि Isn't It Romantic? या दोन हॉलिवूडपटांमध्ये झळकणार आहे. 

Web Title: Priyanka Chopda had to make an hour at the Mumbai airport waiting for the flight;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.