प्रियांका आली ‘लिंक्डइन’वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 12:12 IST2016-11-08T12:12:51+5:302016-11-08T12:12:51+5:30
ग्लोबल ‘देसी गर्ल’ प्रियांका मानसन्मानात आता आणखी एका अचिव्हमेंटची भर पडली आहे. प्रोफेशनल नेटवर्किंग वेबसाईट ‘लिंक्डइन’वर ती ‘इन्फ्ल्युएन्सर’ म्हणून ...

प्रियांका आली ‘लिंक्डइन’वर
ग लोबल ‘देसी गर्ल’ प्रियांका मानसन्मानात आता आणखी एका अचिव्हमेंटची भर पडली आहे. प्रोफेशनल नेटवर्किंग वेबसाईट ‘लिंक्डइन’वर ती ‘इन्फ्ल्युएन्सर’ म्हणून जॉईन झाली आहे. यासह ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, आॅपरा विन्फ्रे आणि राष्ट्रसंघाचे सचिव बान की-मून यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसली.
जगभरातील कर्मचारी आणि कंपन्या या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जोडलेल्या आहेत. एक प्रभावशाली यूजर म्हणून तिचा सामावेश झाल्यामुळे सध्या ती जाम खुश आहे. लागलेच तिने एक आर्टिकलसुद्धा पोस्ट केला. ज्याचे शीर्षक तिने ‘तुमच्या अंत:प्रेरणेला मार्गदर्शक बनवा’ असे दिले.
ती लिहिते, ‘तुमच्या गुणवैशिष्ट्यांचा स्वीकार करून इतरांशी तुलना करणे थांबवा. तुम्ही यूनिक आहात. अनोळखी आणि अज्ञात गोष्टी करण्यापासून स्वत:ला रोखू नका. जोखिम घ्या. तरच उंच भरारी मारता येईल.’
प्रियांका सध्या केवळ अभिनेत्री नाही तर एक व्यवसायिका म्हणूनही समोर येत आहे. ‘पर्पल पेबल’ या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत ती प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची निर्मिती करतेय. आतापर्यंत तिने मराठी, पंजाबी आणि भोजपूरी सिनेमांची निर्मिती केली आहे.
![]()
बिझनेस वुमन : प्रियांका चोप्रा
तिच्या या नव्या इनिंगचा उद्देश आणि कार्यपद्धतीविषयी ती सांगते की, माझे सहकारी कंपनीचे सर्व व्यवहार आणि कामे पाहतात. परंतु स्क्रीप्टची निवड मी स्वत: करते. मी आधी पटकथा वाचते, त्याचे मूल्यांकन करते. कारण जर एखाद्या चित्रपटासोबत माझे नाव जोडले जाणार असेल तर कंटेटच्याबाबतीत मी स्वत:ला वेगळं नाही करू शकत. माझ क्रिएटिव्हली सहभाग असणे फार महत्त्वाचे आहे.
प्रियांका सध्या अमेरिकेत ‘क्वांटिको’ सिरीजच्या दुसऱ्या सीझनची शूटींग करीत असून पुढील वर्षी उन्हाळ्यात ‘बेवॉच’ चित्रपटातून ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यामध्ये तिच्यासोबत झॅक अॅफ्रॉन आणि ड्वेन जॉन्सन दिसणार आहेत. बॉलीवूड प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर अद्याप तिने कोणताच नवीन हिंदी चित्रपट स्विकारलेला नाही. भारतात परत आल्यावर ती निर्मात्यांशी बोलणी आणि पटकथा वाचून निर्णय घेणार असल्याचे कळतेय.
थोडक्यात काय तर ‘पीसी’चे दोन्ही हात वेगवेगळ्या कामांत पुरते गुंतलेले आहेत.