​‘या’ ड्रेसमुळे ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च केली गेली प्रियांका...बघा, या ड्रेसमधील तिच्या दिलखेच अदा...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 16:57 IST2016-12-15T16:33:46+5:302016-12-15T16:57:17+5:30

या वर्षांत गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या लोकप्रीय व्यक्तिंमध्ये तुमची-आमची लाडकी पीसी अर्थात प्रियांका चोप्राची वर्णी लागली आहे. आॅस्कर ...

Priyaanka ... is the most searched on this 'dress'. | ​‘या’ ड्रेसमुळे ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च केली गेली प्रियांका...बघा, या ड्रेसमधील तिच्या दिलखेच अदा...!!

​‘या’ ड्रेसमुळे ‘गुगल’वर सर्वाधिक सर्च केली गेली प्रियांका...बघा, या ड्रेसमधील तिच्या दिलखेच अदा...!!

वर्षांत गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या लोकप्रीय व्यक्तिंमध्ये तुमची-आमची लाडकी पीसी अर्थात प्रियांका चोप्राची वर्णी लागली आहे. आॅस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेडकार्पेट ड्रेसेच्या वर्गवारीत प्रियांकाने सातवे स्थान पटकावले आहे.

सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियांकाने यंदाच्या आॅस्कर पुरस्काराला हजेरी लावली होती. .  हजेरीच नाही तर पांढ-या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमधला रेड कार्पेटवरील तिचा लूक सगळ्यांच्याच पसंतीत उतरला होता. यंदाच्या आॅस्कर सोहळ्याला हजेरी लावणारी प्रियांका एकमेव बॉलिवूड सेलिब्रिटी होतीकानात डायमंड कर्णफुले आणि हातात चंदरी क्लच अशा लूकमध्ये रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियांकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

झुहेर मुराद याने हा गाऊन डिझाइन केला होता. कॅलिफोर्नियातील डॉल्बी थेटरमध्ये आॅस्कर पुरस्कार सोहळा पार पडलेल्या या सोहळ्यातील स्वत:चे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. केवळ इतकेच नाही तर या फोटोला ‘डायमंड हे मुलींचे बेस्ट फ्रेण्ड असतात’ असे कॅप्शन दिले होते. तिच्या या सोहळ्यातील काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 











 आॅस्कर पुरस्कारापूर्वीच्या पार्टीतला प्रियांकाचा लूकही बराच आकर्षक होता. पिपल्स चॉईस अवार्डमधील प्रियांकाचा लूकचीही बरीच चर्चा झाली होती. सध्या प्रियांका तिच्या ‘क्वांटिको २’या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. लवकरच प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा पहिलावहिला हॉलिवूडपट प्रदर्शित होत आहे. या हॉलिवूडपटाचा ट्रेलर अलिकडेच प्रदर्शित झाला. अर्थात प्रियांका यात अगदी काही सेकंदांपुरती झळकली. यामुळे प्रियांकाच्या चाहत्यांची काहीसी निराशा झाली. मात्र तरिही तिच्या  या पहिल्या-वहिल्या हॉलिवूडपटाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
 

Web Title: Priyaanka ... is the most searched on this 'dress'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.