प्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 21:53 IST2018-05-27T16:23:30+5:302018-05-27T21:53:36+5:30

व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारियर हिच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. होय, प्रिया प्रकाश बेरोजगार असून, कामाच्या शोधात ती भटकंती करीत आहे.

Priya Prakash was unemployed; Wandering in search of work! | प्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती!

प्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती!

ल्या अदांनी इंटरनेटवर सनसनी निर्माण करणाºया प्रिया प्रकाश वारियर हिच्या लोकप्रियतेबद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. कारण सोशल मीडियावर तिने कुठलाही व्हिडीओ शेअर केला की, तो वाºयासारखा व्हायरल होतोच. प्रियाची लोकप्रियता पाहता तिच्याकडे प्रोजेक्ट्सच्या रांगा लागल्या असतील असेच दिसते. परंतु प्रियाने जो खुलासा केला त्यावरून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, प्रियाने स्वत:ला जॉबलेस असे म्हटले आहे. शनिवारी इंटरनेट सनसनी असलेल्या प्रियाने ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल राउफ याच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना स्वत:ला बेरोजगार म्हटले आहे. 

फोटोमध्ये प्रिया आणि रोशन क्यूटली पोज देताना दिसत आहेत. प्रियाच्या हातात गुलाबाचे फुल असून, बॅकग्राउंडमध्ये दोघेही खूपच रोमॅण्टिक दिसत आहेत. यावेळी प्रिया येलो आणि व्हाइट लूकमध्ये दिसत असून, रोशनने रेड टी-शर्ट आणि डेनिम परिधान करून पोज दिली आहे. हा फोटो शेअर करताना प्रियाने लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही बरोजगार म्हणून भटकत आहात, परंतु अशातही कोणीतरी तुमच्यासोबत पोज देऊन फोटो काढण्यास तयार असतो तेव्हा...’ 
 

दरम्यान, प्रिया प्रकाश लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जाते. अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खानच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात ती झळकणार असल्याचे बोलले जात आहे. प्रिया प्रकाशच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, तिच्या इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोअर्सची संख्या ६० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तिच्याबद्दल हेदेखील सांगितले जाते की, प्रमोशनल पोस्टसाठी ती आठ लाख रूपयांपर्यंत चार्ज करते. अशातही प्रिया स्वत:ला बेरोजगार संबोधत आहे. 

प्रियाचा जन्म केरळ येथील त्रिशूरमध्ये झाला. ती त्रिशूरमधील विमला कॉलेजमध्ये बी-कॉमच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातही प्रियाने विद्यार्थिनीचीच भूमिका साकारली आहे. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातील ‘मनिक्य मलाराया पूवी’ या गाण्यामुळे ती रातोरात प्रसिद्धीझोतात आली. 

Web Title: Priya Prakash was unemployed; Wandering in search of work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.