या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पूर्व प्रियकर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 12:01 IST2017-11-02T06:31:00+5:302017-11-02T12:01:00+5:30
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का दीपिका इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ...

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा पूर्व प्रियकर करणार बॉलिवूडमध्ये एंट्री
द पिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या प्रेमकथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का दीपिका इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचे निहार पंड्यासोबत अनेक वर्षं अफेअर होते. दीपिकाचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होण्यापूर्वी ती मॉडेलिंग क्षेत्रात काम करायची. तिने बऱ्याच जाहिरातीतदेखील काम केले आहे. याच दरम्यान दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुद्धा बनली होती. येथून दीपिकाच्या लोकप्रियतेत भर पडली. विशेष म्हणजे दीपिका चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअर्समुळेच जास्त चर्चेत राहिली. रणबीर कपूरसोबतचे तिचे अफेअर तर प्रचंड गाजले होते. सिद्धार्थ मालियासोबतच्या तिच्या अफेअरची देखील चांगलीच चर्चा झाली होती. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी दीपिका पादुकोण आणि निहार पंड्या यांचे अनेक वर्षं अफेअर होते. ते दोघे त्यावेळी मॉडलिंगच्या क्षेत्रात होते. विशेष म्हणजे दोघे तीन वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते.
![deepika padukone and nihar pandya]()
आज दीपिका बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दीपिकानंतर आता निहार बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. कंगना रणौतच्या मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असून कंगना राणी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात निहार एका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निहार या चित्रपटात दुसऱ्या बाजीरावांची भूमिका साकारणार आहे. ही व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची असल्याने निहार सध्या या व्यक्तिरेखेवर खूप मेहनत घेत आहे. यासाठी त्याने अनेक अभिनयाच्या वर्कशॉप्सना हजेरी लावली आहे. तसेच घोडेस्वारी, तलवारबाजी यांसारखे प्रशिक्षण घेतले आहे. या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यासाठी तो सगळे प्रयत्न करत आहे.
या चित्रपटात सोनू सूद, अंकिता लोखंडे, वैभव तत्त्ववादी यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २७ एप्रिलला प्रदर्शित होणार असून क्रिश जगरलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. कमल जैन आणि झी स्टुडिओज मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
Also Read : दीपिका पादुकोणच्या ‘सौतन’ची होतेय, जोरदार चर्चा... जाणून घ्या, कोण आहे ही मिस्ट्री वूमन!!