​रिलीजआधी ‘पद्मावती’वर चालणार कात्री! जाणून घ्या यामागचे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 10:50 IST2017-10-31T05:20:09+5:302017-10-31T10:50:09+5:30

संजय लीला भन्साळींनी ‘पद्मावती’ हाती घेतला आणि तेव्हापासून या चित्रपटाबद्दल रोज नव्या चर्चा घडू लागल्या. कधी वाद, कधी सेटची ...

Prior to release 'Padmavati' scissors! Know the reason behind !! | ​रिलीजआधी ‘पद्मावती’वर चालणार कात्री! जाणून घ्या यामागचे कारण!!

​रिलीजआधी ‘पद्मावती’वर चालणार कात्री! जाणून घ्या यामागचे कारण!!

जय लीला भन्साळींनी ‘पद्मावती’ हाती घेतला आणि तेव्हापासून या चित्रपटाबद्दल रोज नव्या चर्चा घडू लागल्या. कधी वाद, कधी सेटची नासधूस, कधी भन्साळींना मिळालेली धमकी असे सगळे सगळे झाले. आता या चित्रपटाबद्दल एक नवी बातमी आहे. होय,भन्साळींनी म्हणे ‘पद्मावती’च्या काही भागांवर कात्री चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात ‘पद्मावती’ फायनल कट्ससह तयार झाला तेव्हा त्याचा रनिंग टाईम २१० मिनिटांचा होता. पण भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या मते, हा रनिंग टाईत आजच्याघडीला खूप मोठा आहे. प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडी-निवडी लक्षात घेता, भन्साळी व टीमने यावर बरीच चर्चा केली आणि या चर्चेचे फलित म्हणजे, ‘पद्मावती’ची लांबी कमी करणे.

होय, चित्रपटातील काही भाग कमी करण्याचा निर्णय भन्साळी व टीमने घेतला आहे.   प्रेक्षकांसाठी हा चित्रपट अधिकाधिक मनोरंजक व्हावा, हा यामागचा टीमचा उद्देश आहे. अर्थात ‘पद्मावती’वर कात्री चालवताना, भन्साळी अतिशय दक्ष असणार आहे. चित्रपटाचा आशय आणि अभिनेत्यांची मेहनत याला कुठलाही धक्का न लागू देण्याचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत. चित्रपटात दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर असे तीन बडे स्टार आहेत.  चित्रपटाची लांबी कमी केल्याने यापैकी कुणीही दुखावले जायला नको, हाही भन्साळींचा प्रयत्न आहे. याआधी भन्साळींनी कधीच चित्रपटाबद्दल निर्णय घेताना कलाकारांचा विचार केला नाही. कारण भन्साळी सर्वात आधी चित्रपटाबद्दल विचार करतात. प्रेक्षकांना एक सुंदर कलाकृती पाहण्याचा अनुभव मिळावा, हा भन्साळींचा उद्देश असतो. पण ‘पद्मावती’बद्दल निर्णय घेताना मात्र भन्साळी कलाकारांच्याही भावनांचा विचार करणार आहेत. आता असे का? हे आम्हाला ठाऊक नाही. (कदाचित यामागे रणवीर व शाहिद यांच्या सुरु असलेले कोल्डवार असू शकते. चित्रपटाचे शूटींग सुरु झाले तेव्हापासून या दोघांमध्ये आपआपल्या भूमिकेच्या महत्त्वावरून स्पर्धा सुरु आहे, हे कुणापासूनही लपलेले नाही.) पण कारण काहीही असो, भन्साळींचा चाहता वर्ग मोठा आहे आणि हे चाहते ‘पद्मावती’च्या रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत, इतकेच.

ALSO READ : दीपिका पादुकोणच्या ‘सौतन’ची होतेय, जोरदार चर्चा... जाणून घ्या, कोण आहे ही मिस्ट्री वूमन!!
 

Web Title: Prior to release 'Padmavati' scissors! Know the reason behind !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.