बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदरच ‘या’ मॉडेलचे अश्लील फोटो झाले व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 16:54 IST2018-05-09T11:24:48+5:302018-05-09T16:54:48+5:30

फिल्मी दुनियेचा झगमगाट प्रत्येकालाच आपल्याकडे आकर्षित करीत असतो. मात्र या ग्लॅमरच्या दुनियेत वावरताना काही कलाकारांसोबत असे काही घडत असते, ...

Prior to entering Bollywood, pornography of this 'model' became viral! | बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदरच ‘या’ मॉडेलचे अश्लील फोटो झाले व्हायरल!

बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याअगोदरच ‘या’ मॉडेलचे अश्लील फोटो झाले व्हायरल!

ल्मी दुनियेचा झगमगाट प्रत्येकालाच आपल्याकडे आकर्षित करीत असतो. मात्र या ग्लॅमरच्या दुनियेत वावरताना काही कलाकारांसोबत असे काही घडत असते, ज्यांची त्यांना भनकही नसते. असेच काहीसे मुंबईतील एका मॉडेलबरोबर घडले आहे. जेव्हा तिला याबाबतची भनक लागली तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. मॉडेल अवंतिकाने स्वत:च तिच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला आहे. 



मॉडेल अवंतिका गोकारने आरोप केला की, हॉलिवूड दिग्दर्शकाने तिचे काही न्यूड फोटोज् लीक केले आहेत. मीडियाशी बोलताना तिने सांगितले की, अमेरिकेच्या प्रसिद्ध स्ट्रिमिंग प्लेफॉर्म नेटफिलिक्सच्या वेब सीरिजमध्ये ती हॉलिवूडच्या एका दिग्दर्शकासोबत काम करीत होती. या सीरिजसाठी तिने काही न्यूड फोटोशूट केले होते. मात्र आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 



पुढे बोलताना अवंतिकाने म्हटले की, आठवडाभरापूर्वी मी एका वेबसाइडवर माझे फोटो अश्लील स्वरूपात व्हायरल केले गेल्याचे मला दिसून आले. त्यामुळे मी संबंधित दिग्दर्शक आणि नेटफिलिक्स यांच्याविरोधात कायदेशीर अ‍ॅक्शन घेणार आहे. तिने म्हटले की, सध्या मी लखनऊ येथे माझ्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे शेड्यूल संपताच मी मुंबईत परतणार आणि संबंधित दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाई करणार आहे. 





दरम्यान, अवंतिका गोकार लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती सध्या पीरियड ड्रामा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत बघावयास मिळणार आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘प्रतापगढ’ आहे. या व्यतिरिक्त ती ‘खतरों के खिलाडी’च्या पुढच्या सीजनमध्येही बघावयास मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Prior to entering Bollywood, pornography of this 'model' became viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.