विरुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळ्यात पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:53 PM2017-12-21T16:53:33+5:302017-12-21T22:35:30+5:30

दिल्ली येथील ताज डिप्लोमेटिक इंक्लेवमध्ये आयोजित केलेल्या विरुष्काच्या लग्नाच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पोहोचले आहेत. ग्रे रंगाचा ...

Prime Minister Narendra Modi arrives at the Grand reception at Virus | विरुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळ्यात पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळ्यात पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी

googlenewsNext
ल्ली येथील ताज डिप्लोमेटिक इंक्लेवमध्ये आयोजित केलेल्या विरुष्काच्या लग्नाच्या ग्रॅण्ड रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच पोहोचले आहेत. ग्रे रंगाचा सुट परिधान केलेल्या नरेंद्र मोदी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. यावेळी त्यांनी विराट-अनुष्काच्या परिवारासमवेत काही फोटोही काढले. वास्तविक जेव्हा रिसेप्शन स्थळाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली तेव्हाच असा अंदाज लावला जात होता की, सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सोहळ्यात एक हजारांपेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते. 



इटलीमध्ये अतिशय शाहि अंदाजात विवाह करणाºया विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा सोहळा सुरू आहे.  या सोहळ्यासाठी क्रि केटसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सोहळ्यात विराट आणि अनुष्काने पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. विराटने कोट घातला असून, अनुष्काने लाल रंगाची जरीकाम केलेली साडी परिधान केली आहे. 



आता विराट आणि अनुष्काच्या विवाहानिमित्त दुसरा रिसेप्शन सोहळा २६ डिसेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे. मंगळवारी दिल्लीत आल्यानंतर नवविवाहित जोडप्याने २१ डिसेंबरला होणाºया रिसेप्शनची जोरदार तयारी केली होती.  मुंबईत होणाºया रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूड व क्र ीडा विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. तर २६ तारखेला मुंबईतील अ‍ॅस्टर बॉलरु म, सेट रेगिस, लोअर परेल येथे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. या रिसेप्शनच्या निमंत्रणपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रिसेप्शन सोहळ्याच्या निमंत्रण  पत्रिकांची थीम पर्यावरणाशी निगडीत आहेत. 

Web Title: Prime Minister Narendra Modi arrives at the Grand reception at Virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.