​प्रीती झिंटाच्या भावाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:43 IST2016-12-03T10:55:40+5:302016-12-03T14:43:12+5:30

अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मावस भावाने शिमला शहराचे उपनगर न्यू शिमला भागात गोळी मारून आत्महत्या केली. नितीन चौहान असे त्याचे ...

Preity Zinta's brother committed suicide | ​प्रीती झिंटाच्या भावाने केली आत्महत्या

​प्रीती झिंटाच्या भावाने केली आत्महत्या

िनेत्री प्रीती झिंटाच्या मावस भावाने शिमला शहराचे उपनगर न्यू शिमला भागात गोळी मारून आत्महत्या केली. नितीन चौहान असे त्याचे नाव असून पोलिसांना सुसाईट नोट्स मिळाल्या आहेत.

न्यू शिमल्यातील सेक्टर-२ येथे कार पार्किंगमध्ये गाडी उभी करून नितीनने स्वत: ला गोळी मारली. घटनास्थळी पोलिस पोहचल्यावर केलेल्या तपासात तो बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा मावस भाऊ असल्याचे निष्पन्न झाले.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठ्यांमध्ये नितीनने त्याच्या सासरच्या मंडळींवर छळ करण्याचा आरोप केला आहे. त्याने लिहिले की, ‘माझ्या पत्नीच्या कुटुंबियाकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.

माझ्यावर निराधार आरोप करून मला खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवले जातेय’. या सुसाईड नोटस्ची सत्यता पडताळण्यासाठी त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आत्महत्या करण्यासाठी वापरलेले गावठी पिस्तुल नितीनकडे कसे आले याचा शोध घेत आहे. त्याच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्या दिवशी नितीनची आई त्याच्या रुममध्ये चहा घेऊन आली तेव्हा तो तेथे नव्हता. आईने घरामध्ये शोधले परंतु तो कुठेच दिसला नाही. अखेर बातमी आली की, त्यांच्या घरापाशी असणाऱ्या पार्किंगमध्ये नितीनने गोळी मारून आत्महत्या केली. गोळी डोक्यातून आरपार गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

काय लिहिलेले आहे सुसाईड नोटमध्ये?

त्याने लिहिले होते की, ‘सासरचे लोक मला माझ्या मुलांशी भेटू देत नाही. माझ्या मुलांवर मी खूप प्रेम करतो. न्यायालयात माझ्यावर खोटे खटले दाखल करून ते माझा छळ करत आहेत. माझ्या आत्महत्येला दुसरे कोणी नाही तर केवळ सासरचेच लोक जबाबदार आहेत.’

Web Title: Preity Zinta's brother committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.