गर्भवती ईशा देओल पुन्हा करणार लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 16:30 IST2017-08-23T11:00:41+5:302017-08-23T16:30:41+5:30

‘गर्भवती ईशा देओल पुन्हा लग्न करणार’ हे हेडिंग वाचून कदाचित तुमचा गोंधळ झाला असेल. पण कुठल्याही निष्कर्षापर्यंत पाहोचण्याअगोदर ईशा ...

Pregnant Isha Deol married again! | गर्भवती ईशा देओल पुन्हा करणार लग्न !

गर्भवती ईशा देओल पुन्हा करणार लग्न !

र्भवती ईशा देओल पुन्हा लग्न करणार’ हे हेडिंग वाचून कदाचित तुमचा गोंधळ झाला असेल. पण कुठल्याही निष्कर्षापर्यंत पाहोचण्याअगोदर ईशा पुन्हा लग्न का करणार? हे जाणून घ्या. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, ईशा या खास दिवशी नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेल्या आउटफिटमध्ये बघावयास मिळणार आहे. अर्थातच ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होती. मात्र ईशा का लग्न करणार याचा आता उलगडा झाला असून, त्याचाच उलगडा आज आम्ही करणार आहोत. 

वास्तविक ईशाचे लग्न २०१२ मध्ये झाले होते. तेव्हा ईशाची आई अभिनेत्री हेमा मालिनी यांनी तिरुपतीहून एका पुजाºयास बोलाविले होते. त्यावेळी संपूर्ण अनुष्ठानादरम्यान तामीळ भाषेत मंत्रोच्चारण करण्यात आले होते. त्यामुळे सोहळ्यात उपस्थित दोन्ही परिवारातील सदस्यांना आणि पाहुणे मंडळींना काहीच कळाले नव्हते. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा लग्न सोहळा उरकण्याचा विचार ईशा आणि तिच्या पतीच्या परिवाराने केला आहे. सूत्रानुसार ओटी भरण्याच्या दिवशीच ईशा पुन्हा लग्न करू शकते. 

मात्र, यावेळेस ती हिंदू पद्धतीनुसार सात फेरे घेणार नसून, सिंधी पद्धतीनुसार तीन फेरे घेणार आहेत. विशेष म्हणजे यावेळेस हिंदी भाषेत संपूर्ण मंत्रोपच्चार केला जाणार आहे. याबाबत जेव्हा ईशाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘यावेळेस जेव्हा आम्ही पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहोत तेव्हा पुरोहित एक सिंधी असतील. त्यांना हिंदी बोलता येत असल्याने दोन्ही परिवाराने त्यांच्याकडून करण्यात येणारा मंत्रोपच्चार समजणार आहे. नवरी म्हणून मी अगोदर वडील धर्मेंद्र यांच्या मांडीवर बसेल, कन्यादानानंतर मी भरतच्या मांडीवर जाऊन बसेल.’ 



पुढे बोलताना ईशाने म्हटले की, ‘या संपूर्ण विधीदरम्यान माझ्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे हा विधी माझ्या आणि माझ्या परिवाराच्या दृष्टीने खूपच भावनात्मक असणार आहे.’ लग्नानंतर तुम्हा दोघांच्या नात्यात काय बदल झाला? असे जेव्हा ईशाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्यातील संबंध खूपच दृढ झाले आहेत. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात माझा मूड खूपच स्विंग होत होता. अशात पती भरतला मला खूप सहन करावे लागले. खरं तर तो माझ्याबाबत खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. तो माझा सर्वात मोठा क्रिटिक आणि मला प्रोत्साहित करणारा मित्र आहे. आमचे आयुष्य खूपच सुखात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ओटी भरण्याच्या कार्यक्रमात भगवान श्रीकृष्णाला छप्पन भोग चढविण्यात येणार आहेत. त्यानंतर पाहुण्यांसाठी सात्विक जेवणाचा बंदोबस्त केला जाईल. या सोहळ्यासाठी देओल आणि तख्तानी परिवाराकडून जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे यामुळे ईशा देओल भलतीच खूश आहे. गरोदरपणाचे हे क्षण ती परिवारासमवेत एन्जॉय करीत आहे. 

Web Title: Pregnant Isha Deol married again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.