आपल्या अटींवर जगतेय पूजा बेदी! आजही तितकीच बोल्ड अन् ग्लॅमरस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 16:13 IST2017-11-09T10:43:03+5:302017-11-09T16:13:03+5:30
आजच आपण पूजा बेदीची ग्लॅमरस लेक आलिया फर्निचरवाला हिचे हॉट फोटोशूट बघितले. आलियाचे हे फोटो पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट ...

आपल्या अटींवर जगतेय पूजा बेदी! आजही तितकीच बोल्ड अन् ग्लॅमरस!!
आ च आपण पूजा बेदीची ग्लॅमरस लेक आलिया फर्निचरवाला हिचे हॉट फोटोशूट बघितले. आलियाचे हे फोटो पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे, आलिया अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. एकेकाळची बोल्ड म्हणणे कदाचित चूक ठरेल कारण पूजा आजही तितकीच बोल्ड अन् ग्लॅमरस आहे. गत मे महिन्यात ४५ वा वाढदिवस साजरा करणाºया पूजाने कधीच जगाची पर्वा केली नाही. ती नेहमी स्वत:च्याच अटींवर जगली, जगतेयं. अगदी काही दिवसांपूर्वी तिने मसाज करतानाचे स्वत:चे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
![]()
‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती.
![]()
‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.
![]()
![]()
ALSO READ : फोटोशूटसाठी आणखीच ‘बोल्ड’ झाली पूजा बेदीची लेक आलिया!!
चित्रपट फ्लॉप झाल्यावर ती छोट्या पडद्याकडे वळली. ‘बिग बॉस’च्या सीझन पाचमध्ये ती दिसली होती. पण बिग बॉसच्या घरातून आऊट झाल्यावर तिने या शोचा होस्ट सलमान खान याच्याविरूद्धच मोर्चा उघडला. सलमान बिग बॉसच्या स्पर्धकांचे खच्चीकरण करतो, असा थेट आरोप तिने लावला होता.
गतवर्षी पूजाच्या वडिलांनी आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत लग्न केले. यावेळी पूजाने आपल्या सावत्र आईला जाहिरपणे ‘डायन’ म्हणून संबोधले होते. ‘प्रत्येक परिकथेत एक दृष्ट सावत्र आई असते. माझ्या आयुष्यात ती आत्ता आली आहे,’ असे टिष्ट्वट तिने केले होते.
पूजा बेदी मोजक्या सिनेमात काम करुनही तिच्या अदा आणि हॉट अंदाजामुळे रसिकांच्या लक्षात राहिली आहे. पूजाची लेकही आईप्रमाणेच हॉट आहे. पूजा बेदीने १९९४ मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले होते. २८ नोव्हेंबर १९९७ रोजी पूजाने आलियाला जन्म दिला होता. २००३ मध्ये पूजा बेदीची घटस्फोट झाला. यानंतर तिने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला.