प्रभासने श्रद्धा कपूरला दिली हैदराबादी जेवणाची ट्रीट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:06 IST2017-09-13T07:29:34+5:302017-09-13T13:06:06+5:30

''बाहुबली 2'च्या रिलीजनंतर काही दिवसांमध्येच प्रभासने साहोमध्ये काम करण्याचे कन्फर्म केले होते. तब्बल चार वर्षांनंतर प्रभास कोणत्या चित्रपटाची शूटिंग ...

Prabhasan gives tremendous support to Kapoor, Hyderabadi dining treat! | प्रभासने श्रद्धा कपूरला दिली हैदराबादी जेवणाची ट्रीट !

प्रभासने श्रद्धा कपूरला दिली हैदराबादी जेवणाची ट्रीट !

'
;'बाहुबली 2'च्या रिलीजनंतर काही दिवसांमध्येच प्रभासने साहोमध्ये काम करण्याचे कन्फर्म केले होते. तब्बल चार वर्षांनंतर प्रभास कोणत्या चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. याआधी तो बाहुबलीमध्ये व्यस्त होता. त्यामुळे बाहुबलीच्या यशानंतर सगळ्यांचे डोळे साहोवर लागले आहेत. ज्याची शूटिंग आता सुरु झाली आहे. प्रभाससह इतर स्टारकास्टने सुद्धा चित्रपटाची शूटिंग सुरु केली. काही दिवसांपासून चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार यावरुन बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. आधी या भूमिकेसाठी अनुष्का शेट्टीचे नाव फायनल करण्यात आले होते मात्र ऐनवेळी निर्णय बदलला आणि तिची जाग चित्रपटात श्रद्धा कपूरने घेतली. श्रद्धाने ट्वीटर अकाऊंटवरुन ही माहिती स्वत: दिली. चित्रपट साईन केल्यानंतर श्रद्धा प्रभासला अद्याप भेटली नव्हती. मात्र आता चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती सुद्धा हैदराबादमध्ये दाखल झाली आहे आणि तिने सुद्धा शूटिंग सुरु केली आहे. श्रद्धा साहोच्या सेटवर पोहोचल्यावर प्रभासने तिला हैदराबादी जेवणाचा आस्वाद घ्यायला दिला. प्रभासने जवळपास 17-18 पदार्थ तयार करुन घेतले होते. ज्याची चव श्रद्धाने मोठ्या उत्साहात घेतली. प्रभासने केलेले हे स्वागत बघून श्रद्धा क्लीन बोल्ड झाली.  

ALSO READ : प्रभासच्या 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर दिसणार डबल रोलमध्ये.. वाचा सविस्तर

प्रभास आपल्या आगामी चित्रपटाला घेऊन खूपच उत्साहित आहे. तर श्रद्धादेखील कमालीची एक्ससाईटेड आहे. यात तिचा डबल रोल असल्याचे ही कळते आहे. साहोच्या सेटवर प्रभास श्रद्धाला तेलगू भाषेचे धडे देणार आहे तर श्रद्धा त्याला हिंदी भाषा शिकवणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट १५० कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी  १२ कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला  ९ कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली. लवकरच श्रद्धाचा हसीना पारकर हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर श्रद्धा काही दिवसांपूर्वी भारताची फुलराणी सायना नेहवाल कडून बॅडमिंटनेचे धडे गिरवताना ही दिसली होती. सायनच्या बायोपिकमध्ये श्रद्धा झळकणार आहे.   

Web Title: Prabhasan gives tremendous support to Kapoor, Hyderabadi dining treat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.