​प्रभास म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम करण्याची घाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 19:52 IST2016-10-23T19:42:16+5:302016-10-23T19:52:26+5:30

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी मला चित्रपटाची आॅफर केल्या होत्या

Prabhas says there is no hurry to work in Bollywood | ​प्रभास म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम करण्याची घाई नाही

​प्रभास म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम करण्याची घाई नाही

ong>बाहुबली म्हणून देशभर प्रसिद्ध झालेला अभिनेता प्रभास बॉलिवूड काम करणार आहे. आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करताना त्याने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. बाहुबली प्रदर्शित झाल्यावर बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी मला चित्रपटाची आॅफर केल्या होत्या मात्र मी ‘बाहुबली’च्या दुसºया भागात व्यस्त असल्याने त्यांना वेळ देऊ शकलो नाही असेही तो म्हणाला. 



प्रभास म्हणतो, एकटा ‘बाहुबली’ 100 चित्रपटांची बरोबरी करणार आहे. मला बॉलिवूडमध्ये काम करण्याची कोणतिही घाई नाही, मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बॉलिवूडमध्ये काम करेल. मी बॉलिवूड चित्रपटात दिसेल पण मला कोणतिही घाई नाही असेही तो म्हणाला. ‘बाहुबली 2’ चा फर्स्ट लूक व सेटवरील व्हिडीओ माझ्या चाहत्यांसाठी वाढदिवसाची भेट आहे. 

गतवर्षी प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ हा चित्रपट बॉलिवूडमधील मोठ्या चित्रपटात सामील झाला आहे. साऊथच्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक 600 कोटींची कमाई केली होती.  हिंदी वर्जनने देखील 100 कोटींचा गल्ला जमविला होता. आता या चित्रपटच्या दुसºया भागाची प्रतिक्षा लागली आहे. काल या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यावर बाहुबलीचा सेट कसा तयार करण्यात आला याची माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ प्रभासने शेअर केला आहे.  6 मिनिटाच्या या व्हिडीओत चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार सेटबद्दलची माहिती देत आहेत. बाहुबलीच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. 



या व्हिडीओमध्ये प्रभास, अनुष्का शेट्टी, राना दुग्गबाती, कटप्पा व एसएस. राजमौली दिसत असून ते सर्व महिष्मती राज्यातील शूटिंगचे अनुभव शेअर करीत आहेत. बाहुबलीच्या चाहत्यांची उत्सुकता हा व्हिडीओ पाहिल्यावर द्विगुणीत होणार आहे. 

Web Title: Prabhas says there is no hurry to work in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.