बॉलिवूड डेब्यूसाठी प्रभास अन् अनुष्का शेट्टी गिरवतात हिंदीचे धडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 14:37 IST2017-07-04T09:07:20+5:302017-07-04T14:37:20+5:30

‘बाहुबली-२’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाºया साउथ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या बॉलिवूड डेब्यूविषयी प्रचंड ...

Prabhas and Anushka Shetty learns Hindi lessons for Bollywood debuts !! | बॉलिवूड डेब्यूसाठी प्रभास अन् अनुष्का शेट्टी गिरवतात हिंदीचे धडे!!

बॉलिवूड डेब्यूसाठी प्रभास अन् अनुष्का शेट्टी गिरवतात हिंदीचे धडे!!

ाहुबली-२’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाºया साउथ अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या बॉलिवूड डेब्यूविषयी प्रचंड आतुरता निर्माण झालेली आहे. हिंदी भाषिक चित्रपटांमध्ये या दोघांना बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले असून, अनेक निर्माते त्यांना आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यासाठी धडपड करीत आहेत. सध्या त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. परंतु कोणत्या निर्मात्यांसोबत किंवा कोणत्या बॉलिवूडपटात झळकतील हे मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आता आलेल्या माहितीनुसार सध्या हे दोन्ही स्टार्स हिंदी भाषेचे धडे गिरवीत असून, बॉलिवूड डेब्यूची जोरदार तयारी करीत आहेत. 

‘बाहुबली-२’मध्ये प्रभास ‘बाहुबली’ आणि अनुष्का ‘देवसेना’ या भूमिकांमध्ये झळकले होते. त्यांच्या या भूमिका प्रचंड पॉप्युलर झाल्या होत्या. आजही ‘बाहुबली’ आणि ‘देवसेना’ हे नावे प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. किंबहुना देशातील बाहुतांश भागांमध्ये ‘बाहुबली-२’ थिएटरमध्ये झळकत असल्याने या दोन्ही स्टार्सचा प्रभाव कायम आहे. दरम्यान, या दोघांना मिळालेले स्टारडम लक्षात घेता आज प्रत्येक निर्माता त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक दिसत आहे. शिवाय हे दोघेही सध्या बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी उत्सुक असून, त्याकरिता हिंदीचे धडे गिरवीत आहेत. 



प्रभासला बॉलिवूडमध्ये कोण लॉन्च करणार याकरिता सध्या निर्मात्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर अनुष्काला लॉन्च करण्यासाठी अभिनेत्री श्रीदेवी हिने कंबर कसली आहे. सुरुवातीला अनुष्का ‘सिंघम’ या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याची शक्यता वर्तविली गेली होती. परंतु अर्थकारणावरून तिने नकार दिला. आता ती कोणत्या चित्रपटातून डेब्यू करेल हे सांगणे मुश्किल आहे. मात्र दोन्ही स्टार्सची हिंदी शिकण्याची धडपड पाहता, ते लवकरच बॉलिवूडपटात झळकतील असे बोलले जात आहे. 

दरम्यान, ‘बाहुबली-२’नंतर प्रभास आणि अनुष्का आगामी ‘साहो’ या तेलगू चित्रपटात बघावयास मिळतील. हा एक अ‍ॅक्शनपट असून, त्याचा टिझर ‘बाहुबली-२’प्रसंगीच रिलीज करण्यात आला होता. या सुरुवातीला प्रभासची हिरोईन म्हणून सोनम कपूरचे नाव आघाडीवर होते. परंतु आता तिची जागा अनुष्काने घेतल्याने पुन्हा एकदा प्रभास आणि अनुष्काचा रोमान्स प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. ‘बाहुबली-२’मध्ये दोघांची चांगली केमिस्ट्री रंगली होती. अशीच काहीशी केमिस्ट्री ‘साहो’मध्ये बघावयास मिळण्याची शक्यता आहे. 

वास्तविक अनुष्का आणि प्रभासने ‘बाहुबली’ अगोदरच अनेक तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘बाहुबली’ला मिळालेल्या अफाट यशामुळे या जोडीला आता नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय तब्बल पाच वर्ष एकाच चित्रपटामध्ये काम केल्याने दोघांमधील केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. असो, आता या दोघांनी लवकरच बॉलिवूडपटामध्ये झळकावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल. दोघेही एकाच बॉलिवूडपटात झळकल्यास चाहत्यांचा आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही. 

Web Title: Prabhas and Anushka Shetty learns Hindi lessons for Bollywood debuts !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.