पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 19:27 IST2020-09-22T19:24:25+5:302020-09-22T19:27:57+5:30
22 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

पतीनं विनयभंग केल्याचा पूनम पांडेचा आरोप; पतीला गोवा पोलिसांकडून अटक
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव : आपल्या सेमी न्यूड पोजेससाठी लोकप्रिय ठरलेल्या बॉलीवूड सेन्सेशन पूनम पांडे हिने सध्या गोव्यातही खळबळ निर्माण केली आहे. काणकोण येथे शूटिंगसाठी आलेले असताना आपला पती सॅम बॉम्बे याने आपला विनयभंग केल्याची तक्रार पूनम पांडेने केली आहे. त्यानंतर काणकोण पोलिसांनी त्याला अटक केली.
सॅम बॉम्बे (मूळ नाव सॅम अहमद) हा व्यवसायाने फिल्म प्रोड्युसर असून हल्लीच म्हणजे 1 सप्टेंबर रोजी त्याचे आणि पुनमचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर ते फिल्म शूटिंगसाठी सध्या गोव्यात आले होते. पाळोले काणकोण येथे सरोवर या हॉटेलात ते दोघे सध्या राहत होते. सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला असे तिने म्हटले आहे. काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण याना याबद्दल विचारले असता मंगळवारी सॅमला पोलिसांनी अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.
पूनम पांडे ही आपल्या हॉट अदांसाठी सिने रसिकांमध्ये प्रसिद्ध असून तिच्या ट्विटर व इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या सेमी न्यूड फोटोमुळे ती नेहमीच चर्चेत असते.