Poonam Pandey : "माझी आई कॅन्सरने गेली", पूनम पांडेवर भडकला अभिनेता; म्हणाला - मृत्यू म्हणजे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 03:59 PM2024-02-03T15:59:20+5:302024-02-03T15:59:52+5:30

Poonam Pandey's Fake Demise : पूनम पांडेच्या जनजागृती स्टंटनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केला संताप, म्हणाला -कॅन्सरमुळे...

poonam pandey fake demise actor shardul pandit lashes out at actress said death is not a joke | Poonam Pandey : "माझी आई कॅन्सरने गेली", पूनम पांडेवर भडकला अभिनेता; म्हणाला - मृत्यू म्हणजे...

Poonam Pandey : "माझी आई कॅन्सरने गेली", पूनम पांडेवर भडकला अभिनेता; म्हणाला - मृत्यू म्हणजे...

सोशल मीडिया सेन्सेशन आणि मॉडेल पूनम पांडेनेकॅन्सर जनजागृतीसाठी केलेल्या कृत्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. २ फेब्रुवारीला सकाळी पूनमच्या इन्स्टाग्रामवरुन तिचं निधन झाल्याची पोस्ट करण्यात आली होती. सर्व्हायकल म्हणजेच गर्भाशयाच्या कॅन्सरने तिचा मृत्यू झाल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. तिच्या निधनाच्या बातमीने पूनमच्या जवळच्या व्यक्तींना आणि चाहत्यांना धक्का बसला होता. अखेर, शुक्रवारी सकाळी इन्स्टा लाइव्हवरुन पूनमने ती जिवंत असून तिचा मृत्यू गर्भाशयाच्या कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हे नाटक केल्याचंही पूनमने सांगितलं. 

पूनमच्या या व्हिडिओनंतर तिचा मित्र आणि अभिनेता शार्दुल पंडीतने संताप व्यक्त केला आहे. शार्दुलने एक व्हिडिओ शेअर करत पूनमने केलेल्या या जनजागृती स्टंटबाबत भाष्य केलं आहे. शार्दुल म्हणतो, "पूनम जिवंत आहे, यासाठी मी देवाचे आभार मानतो. मी हा व्हिडिओ का बनवतोय? मी तिला कॉल का केला नाही? तर मी तिला कॉल केला होता. पण, तिचा फोन व्यस्त येत आहे. मी तिला अनेकदा फोन केले. मला त्या सगळ्यांची माफी मागायची आहे, ज्यांनी काल माझी काळजी घेतली. त्या लोकांची मी माफी मागतो ज्यांच्याशी मी ऑनलाईन भांडलो की तुम्ही असा विचार का करत आहात. मी सगळ्या मीडिया पत्रकारांचीही माफी मागतो. कोणाच्याही मृत्यूवर मला प्रसिद्धी मिळवायची नाही, असं मी त्यांना म्हणालो होतो. माझ्या मित्रांचीही मी माफी मागतो." 

"माझी आई कॅन्सरमुळे गेली. ज्या कोणाची ही कल्पना होती. जनजागृती करण्याचा तुमचा हेतू कितीही चांगला असला तरीही हे योग्य नाही. मला पूनमची काळजी आहे. कालच्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला. तुम्ही तिला ओळखत नाही, असं मी सगळ्यांना म्हणत होतो. पण, काही गोष्टींची मर्यादा असते. जनजागृती करायला हवी पण तुम्हाला काय झालंय? मृत्यू हा जोक नव्हे. कॅन्सरमुळे मी माझ्या आईला गमावलं. ही कल्पना अजिबात चांगली नव्हती," असं म्हणत शार्दुलने संताप व्यक्त केला आहे. 

 पूनम पांडेने सर्व्हायकल कॅन्सर आणि त्याच्या जनजागृतीसाठी ही वेबसाइटही लॉन्च केली आहे. पण, गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याचं नाटक केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पूनमने याबाबत एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफीही मागितली आहे. 

Web Title: poonam pandey fake demise actor shardul pandit lashes out at actress said death is not a joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.