Poonam pandey : "पूनम जिवंत आहे, तिने...", बहिणीशी बोलून सिनेमा समिक्षकाने केलं ट्विट; एक्स बॉयफ्रेंडचाही हाच दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:09 AM2024-02-03T11:09:59+5:302024-02-03T11:10:11+5:30

Poonam Pandey Death Update : एकीकडे पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचे निधन झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले. तर दुसरीकडे फॅशन आणि चित्रपट समीक्षक उमैर संधु यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे.

"Poonam is alive, she...", the film critic tweeted after talking to his sister; Ex boyfriend also claims the same | Poonam pandey : "पूनम जिवंत आहे, तिने...", बहिणीशी बोलून सिनेमा समिक्षकाने केलं ट्विट; एक्स बॉयफ्रेंडचाही हाच दावा

Poonam pandey : "पूनम जिवंत आहे, तिने...", बहिणीशी बोलून सिनेमा समिक्षकाने केलं ट्विट; एक्स बॉयफ्रेंडचाही हाच दावा

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे(Poonam Pandey)चं २ फेब्रुवारी रोजी कॅन्सरने निधन झाले. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. तिच्या मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली. मात्र तिने यापूर्वी कॅन्सर झाल्याचे कोणत्याच मुलाखतीत सांगितले नव्हते. त्यामुळे तिचा खरंच मृत्यू झाला आहे का, असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. आता तिच्या निधनाच्या वृत्तानंतर काही जण ती जिवंत असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान आता तिची कजिन आणि एक्स बॉयफ्रेंडनेदेखील ती जिवंत असल्याचा दावा केला आहे.

एकीकडे पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचे निधन झाल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले. तर दुसरीकडे फॅशन आणि चित्रपट समीक्षक उमैर संधु यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. उमैर यांचे म्हणणे आहे की, पूनम जिवंत आहे आणि ती तिच्या मृत्यूच्या बातम्या एन्जॉय करते आहे. त्यांनी ट्विटमध्ये दावा केला आहे की, ते पूनमची बहिण (कजिन)सोबत बोलले आहेत आणि हा पूनमचा पब्लिसिटी स्टंट आहे.

''..तर तिला अटक व्हायला हवी'', चाहते संतापले
उमैर संधू यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आताच पूनम पांडेच्या कजिनसोबत बोललो. ती जिवंत आहे आणि आपल्या निधनाच्या बातम्या एन्जॉय करत आहे. पूनमने पब्लिसिटी स्टंट केला आहे. उमैर संधू यांच्या ट्विटवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. लोक गोंधळून गेले आहेत.

नेटकरी कमेंट करून विचारत आहेत की, हे खरे आहे का? दुसऱ्या युजरने म्हटले की, खूपच वाईट स्टंट आहे. तर आणखी एकाने लिहिले की, तुम्ही हे कन्फर्म सांगत आहात का? आम्हाला प्रुफ हवा आहे. दुसऱ्याने लिहिले की, यातून तिला काय मिळणार ? तिचे निधन झाले नसेल, तर तिला अटक व्हायला हवी. लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्तानंतर तिच्याशी संबंधीत काहीच अपडेट अद्याप समोर आलेली नाही. तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार कुठे आणि कधी होणार, या संदर्भात काहीच समजू शकलेलं नाही.

एक्स बॉयफ्रेंडनेही केला जिवंत असल्याचा दावा
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, पूनमच्या ड्रायव्हरने सांगितले की, काल संध्याकाळपर्यंत ती वांद्रे येथील फ्लॅटमध्ये होती आणि अचानक कुठेतरी बाहेर गेली. तर अभिनेत्रीच्या एका मैत्रिणीने सांगितले की, तिला बऱ्याच दिवसांपासून ब्रेन ट्यूमरचा त्रास होता आणि आज सकाळी ७ वाजता कानपूरमध्ये तिचे निधन झाले.  मात्र तिचा एक्स बॉयफ्रेंड बिपिन हेडेकर म्हणाला की, पूनमला काहीही झालेलं नाही.


 

Web Title: "Poonam is alive, she...", the film critic tweeted after talking to his sister; Ex boyfriend also claims the same

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.