शानदार, जबरदस्त! बॉक्स ऑफिसवर ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची जादू कायम, जाणून घ्या आतपार्यंतची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 02:26 PM2023-05-08T14:26:03+5:302023-05-08T14:38:27+5:30

रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Ponniyin selvan 2 aka ps 2 box office collection day 9 aishwarya rai chiyaan vikram starrer collects this much on 2nd saturday | शानदार, जबरदस्त! बॉक्स ऑफिसवर ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची जादू कायम, जाणून घ्या आतपार्यंतची कमाई

शानदार, जबरदस्त! बॉक्स ऑफिसवर ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची जादू कायम, जाणून घ्या आतपार्यंतची कमाई

googlenewsNext

ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन २'ने पहिल्या दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. याचा फटका सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाला बसला. 'पोन्नियिन सेल्वन २'ने सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. जाणून घेऊया आतापर्यंत या सिनेमाच्या कमाईचा आकडा. 

जगभरात 250 कोटींचा आकडा पार करणाऱ्या 'पोन्नियिन सेल्वन २' भारतातही 150 कोटींचा आकडा पार करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या मते, ऐश्वर्या रायच्या चित्रपटाने दुसऱ्या शनिवारी म्हणजेच नवव्या दिवशी 8 कोटींचा बिझनेस केला आहे. चित्रपटाने भारतात आतापर्यंत 142.10 कोटींची कमाई केली आहे, 150 कोटींचा पार करणाऱ्या चित्रपट काही पावले दूर आहे.

कमाईबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 24 कोटी, दुसऱ्या दिवशी 26.2 कोटी, तिसऱ्या दिवशी 30.3 कोटी, चौथ्या दिवशी 23.25 कोटी, पाचव्या दिवशी 10.5 कोटी, सहाव्या दिवशी 7.75 कोटी, सहाव्या दिवशी 6.6 कोटींची कमाई केली आहे. सातव्या दिवशी कोटी, त्यानंतर चित्रपटाचे वीकेंड कलेक्शन 128.6 कोटी झाले आहे. आठव्या दिवशी 5.50 कोटींच्या कमाईसह 134.10 कोटींचा आकडा पार केला आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2'मध्ये विक्रम, जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला दिसत आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई होत आहे.

Web Title: Ponniyin selvan 2 aka ps 2 box office collection day 9 aishwarya rai chiyaan vikram starrer collects this much on 2nd saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.