​प्लीज,अफवा पसरवू नकोस...! कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 12:25 IST2018-03-18T06:28:47+5:302018-03-18T12:25:19+5:30

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडण आता जुनी गोष्ट झाली, असा तुमचा अंदाज असेल तर ते चूक ...

Please, do not spread rumors ...! Kapil Sharma told Sunil Grover !! | ​प्लीज,अफवा पसरवू नकोस...! कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला सुनावले!!

​प्लीज,अफवा पसरवू नकोस...! कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला सुनावले!!

मेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील भांडण आता जुनी गोष्ट झाली, असा तुमचा अंदाज असेल तर ते चूक आहे. कदाचित अद्यापही दोघांच्या मनातील कटुता गेलेली नाही. दोघांच्याही ताज्या Tweetsवरून तरी तसेच दिसतेय.


होय, कपिलचा  ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ हा नवा कोरा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या शोमध्ये सुनील ग्रोव्हर दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला होता. अखेर एका चाहत्याने याबद्दल थेट सुनील ग्रोव्हरलाचं विचारले. तुला कपिलच्या नव्या शोसाठी विचारणा झालीयं का? असा प्रश्न या चाहत्याने सुनीलला सोशल मीडियावर विचारला. यावर सुनीलने अगदी सविस्तर उत्तर दिले. ‘भाई, आप जैसे कुछ और लोग भी मुझसे सेम पुछते है. लेकीन मुझे इस शो के लिए कॉल नहीं आया. मेरा फोन नंबर भी सेम है. इंतजार कर के अब मैने कुछ और साईन कर लिया कल. आप लोगों की दुआ से एक अच्छे प्रोजेक्ट के साथ जुडा हूं. जल्दी आपके सामने आता हू...’, असे सुनीलने लिहिले.


ALSO READ :  रात्रीच्या अंधारात कपिल शर्माचे नवे ‘कांड’! लोकांनी पाजलेत उपदेशाचे डोस!!

पण  सुनीलचा हा रिप्लाय कपिलला अजिबात रूचला नाही आणि त्याने लगेच सुनीलला सुनावले. ‘पाजी, मी तुला १०० पेक्षा अधिक वेळा कॉल केला. दोनदा तुझ्या घरीही येऊन गेलो. प्रत्येक वेळी तू कुठल्याशा शो वा अन्य कारणास्तव बाहेर होताच. प्लीज, मी तुला कॉल केला नाही,अशा अफवा पसरवू नकोस,’ असे कपिलने लिहिले. केवळ इतकेच नाही तर,‘सुनील खोटा बोलतोय. मी त्याला शंभरदा कॉल केला. त्याच्या घरी गेलो.  पण आता मी कुणालाच माझ्या नावाचा फायदा घेऊ देणार नाही. आता पुरे झाले,’असे कपिलने सुनीलला उद्देशून लिहिले.
अद्याप कपिलच्या या Tweet ला सुनीलने उत्तर दिलेले नाही. आता तो काय उत्तर देतो आणि हे प्रकरण इथेच थांबते की, आणखी पुढे जाते ते बघूच.
गत वर्षभरात कपिलच्या करिअरची गाडी रूळावर घसरली होती. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला  आजारपणाने  घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता. यानंतर कपिलने ‘फिरंगी’ हा चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा चित्रपटही जोरात आपटला होता. ‘फिरंगी’च्या अपयशाने कपिल पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेल्याचेही मध्यंतरी ऐकिवात आले होते.  

Web Title: Please, do not spread rumors ...! Kapil Sharma told Sunil Grover !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.