शाहरूखने पोस्ट केला सोहितने काढलेला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:46 IST2016-01-16T01:18:42+5:302016-02-07T08:46:56+5:30

बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल 'राज-सिम्रन' हे पुन्हा एकदा 'दिलवाले' चित्रपटातून चाहत्यांना भेटण्यासाठी येत आहेत. १८ डिसेंबरला 'दिलवाले' रिलीज होणार ...

Photographed by Shah Rukh Khan posted! | शाहरूखने पोस्ट केला सोहितने काढलेला फोटो!

शाहरूखने पोस्ट केला सोहितने काढलेला फोटो!

लिवूडमधील सर्वांत लोकप्रिय कपल 'राज-सिम्रन' हे पुन्हा एकदा 'दिलवाले' चित्रपटातून चाहत्यांना भेटण्यासाठी येत आहेत. १८ डिसेंबरला 'दिलवाले' रिलीज होणार असून चाहते मात्र बोटावर दिवस मोजत आहेत. अजून दोन महिने बाकी असून राज आणि सिम्रन यांची लव्हस्टोरी पडद्यावर पहायला सर्वजण आतुर आहेत. चित्रपटाची शूटिंग शेवटच्या टप्प्यात असून टीमलाही चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्कंठा लागली आहे. शाहरूख खान मात्र वेळोवेळी चित्रपटाविषयीचे अपडेट्स टिवटरवर देत असतो. त्याने नुकताच सेटवरील राज-सिम्रनचा एक ब्लॅक अँण्ड व्हाईट ड्रेसिंग मधील फोटो टिवटरवर टाकला आहे. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की,' रोहित तो फिल्म अच्छी बनायेगा ही, लेकिन आप देख लो ये उसने निकला हुआ फोटो.' सध्या चित्रपटाची टीम हैदराबादमध्ये शूटिंग करत असून पुन्हा एकदा जोडीची जादू अनुभवायला मिळणार यात काही शंका नाही.

Web Title: Photographed by Shah Rukh Khan posted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.